५ सप्टेंबर दिनविशेष

५ सप्टेंबर दिनविशेष - [5 September in History] दिनांक ५ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
५ सप्टेंबर दिनविशेष | 5 September in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ५ सप्टेंबर चे दिनविशेष


सर्वेपल्ली राधाकृष्णन - (५ सप्टेंबर १८८८ - १७ एप्रिल १९७५) भारताचे दुसरे राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ. डॉ सर्वेपल्ली राधाकृष्णन भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते.


शेवटचा बदल ५ सप्टेंबर २०२१

जागतिक दिवस
५ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • शिक्षक दिन: भारत.

ठळक घटना / घडामोडी
५ सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १९०५: रशिया-जपान युद्ध-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्टच्या मध्यस्थीने न्यू हॅम्पशायर राज्यात जेता जपान व रशियात संधी.
 • १९१४: पहिले महायुद्ध-पॅरिसवर चाल करून आलेल्या जर्मन सैन्याला फ्रेंच सैन्याने मागे रेटले.
 • १९१५: झिमरवाल्ड परिषद सुरू.
 • १९३२: बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन.
 • १९३७: स्पॅनिश गृहयुद्ध-लेन्स शहर फ्रँकोच्या ताब्यात.
 • १९३९: दुसरे महायुद्ध-अमेरिकेने आपण तटस्थ असल्याचे जाहीर केले.
 • १९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.
 • १९४२: दुसरे महायुद्ध-मिल्ने बेची लढाई-जपानच्या आरमाराने माघार घेतली.
 • १९४४: दुसरे महायुद्ध-बेल्जियम, नेदरलँड्स व लक्झेंबर्ग मिळून बेनेलक्स तयार झाले.
 • १९६०: रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले.
 • १९६१: अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.
 • १९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले.
 • १९७०: इटालियन ग्रांप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्मूला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन रांड हे एकमेव ड्रायव्हर ठरले.
 • १९७२: ब्लॅक सप्टेंबर नावाने वावरणार्‍या पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी म्युनिक हत्याकांड-म्युनिकमधील ऑलिंपिक खेळात भाग घेणाऱ्या इस्रायेलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.
 • १९७५: कॅलिफोर्नियातील साक्रामेंटो शहरात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खूनी हल्ला.
 • १९७७: व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
 • १९८०: स्वित्झर्लंडमधील सेंट गॉट्टहार्ड बोगदा खुला.
 • १९८४: एस.टी.एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.
 • १९८६: कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पॅन ऍम फ्लाइट ०७३चे अपहरण.
 • २०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
 • २००५: मंडाला एरलाइन्स फ्लाइट ०९१ हे बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील दाट वस्तीच्या भागात कोसळले. विमानातील १०४ व जमीनीवरील ३९ व्यक्ती ठार.

जन्म / वाढदिवस / जयंती
५ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ११८७: लुई आठवा (फ्रांसचे राजे, मृत्यू: ८ नोव्हेंबर १२२६).
 • १६३८: लुई चौदावा (फ्रांसचे राजे, मृत्यू: १ सप्टेंबर १७१५).
 • १८२६: जॉन विस्डन (ब्रिटीश क्रिकेट रसिक, प्रकाशक, मृत्यु: ५ एप्रिल १८८४).
 • १८४७: जेसी जेम्स (अमेरिकन दरोडेखोर, मृत्यु: ३ एप्रिल १८८२).
 • १८७२: व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई (भारतीय वकील आणि राजकारणी, मृत्यू: १८ नोव्हेंबर १९३६).
 • १८८८: सर्वेपल्ली राधाकृष्णन (भारताचे राष्ट्रपती, मृत्यु: १७ एप्रिल १९७५).
 • १९०७: जयंत पांडुरंग तथा जे. पी. नाईक (शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग चे संस्थापक, मृत्यू: १० ऑगस्ट १९८१).
 • १९०९: आर्ची जॅक्सन (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, मृत्यु: १६ फेब्रुवारी १९३३).
 • १९१०: फिरोझ पालिया (भारतीय क्रिकेट खेळाडू, मृत्यु: ९ सप्टेंबर १९८१).
 • १९२०: लीलावती भागवत (बालसाहित्यिका, मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३).
 • १९२८: दमयंती जोशी (सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना, मृत्यू: १९ सप्टेंबर २००४).
 • १९४०: राकेल वेल्च (अमेरिकन अभिनेत्री).
 • १९४६: फ्रेडी मर्क्युरी (मूळ भारतीय वंशाचे ब्रिटीश गायक व संगीतकार, मृत्यु: २४ नोव्हेंबर १९९१).
 • १९५४: रिचर्ड ऑस्टिन (वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू, मृत्यु: ७ फेब्रुवारी २०१५).
 • १९६९: मार्क रामप्रकाश (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
 • १९७२: गाय व्हिटॉल (झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू).
 • १९७४: रॉल लेविस (वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू).
 • १९७८: सिल्व्हेस्टर जोसेफ (वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू).
 • १९८६: प्रग्यान ओझा (भारतीय क्रिकेट खेळाडू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
५ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८७७: क्रेझी हॉर्स (अमेरिकेतील सू जमातीचे नेते, जन्म: १८४०).
 • १९०६: लुडविग बोल्ट्झमन (ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ, जन्म: २० फेब्रुवारी १८४४).
 • १९१८: सर रतनजी जमसेटजी टाटा (उद्योगपती, जन्म: २० जानेवारी १८७१).
 • १८७६: मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा (चिली देशाचे पहिले राष्ट्रपती, जन्म: २१ एप्रिल १७९०).
 • १९७८: रॉय किणीकर (कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार, जन्म: १९०८).
 • १९९१: शरद जोशी (हिंदी कवी, लेखक व उपहासकार, जन्म: २१ मे १९३१).
 • १९९५: सलील चौधरी (हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार, जन्म: १९ नोव्हेंबर १९२२).
 • १९९६: बॅसिल सालदवदोर डिसोझा (भारतीय बिशप, जन्म: २३ मे १९२६).
 • १९९७: मदर तेरेसा (समाजसेविका, जन्म: २६ ऑगस्ट १९१०).
 • २०००: पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर (स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती, जन्म: १२ डिसेंबर १९१६).
 • २०००: रॉय फ्रेड्रिक्स (वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू, जन्म: ११ नोव्हेंबर १९४२).
 • २०१५: आदेश श्रीवास्तव (भारतीय गायक-गीतकार, मृत्यू: ४ सप्टेंबर १९६४).

दिनविशेष        सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.