आई म्हणजे अशी माया - मराठी कविता

आई म्हणजे अशी माया, मराठी कविता - [Aai Mhanje Ashi Maaya, Marathi Kavita] आई म्हणजे अशी माया, जिला अंत नाही, मी वेडा पाण्यात पाहतो जेव्हा.
आई म्हणजे अशी माया - मराठी कविता | Aai Mhanje Ashi Maaya - Marathi Kavita
आई म्हणजे अशी माया
जिला अंत नाही
मी वेडा पाण्यात पाहतो जेव्हा
आईचेच प्रतिबिंब मला दिसत जाई

कविता लिहाविशी वाटते आईवर
तर कधी गावे वाटते तिचे गुणगान
प्रेम शोधले जगात तरी ही
मिळणार नाही आईचे प्रेम महान

अरे प्रेम, लाड, मदत
हे तर सर्वांची आई करते
पण माझ्यासाठी आई जे करते
ते मला जगातल्या आईंपेक्षा वेगळे वाटते

सातसमुद्रांच्या पलिकडे
डोंगरदर्‍यांच्या अलिकडे
अश्या ठिकाणी न्यावे आईला
जिथे वात्सल्य व आईच दिसावी सगळीकडे

मोठा झालो असलो तरी मी
आईसमोर लहान आहे
पुन्हा बालपणात जावून
आईच्या कुशीत निजण्याची तहान आहे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.