आई सावित्री - मराठी कविता

आई सावित्री, मराठी कविता - [Aai Savitri, Marathi Kavita] आई सावित्री शिकली, घेतला वसा शिक्षणाचा, अख्ख्या जगाने मानली, आई सावित्री शिकली.
आई सावित्री - मराठी कविता | Aai Savitri - Marathi Kavita
आई सावित्री शिकली
घेतला वसा शिक्षणाचा
अख्ख्या जगाने मानली
आई सावित्री शिकली

शेण मातीचे गोळ
तिच्या हातामंदी बळ
अन्‌ लोकांचा रोष
तिच्या मनामधी हर्ष

अहो उचललं पाऊल
झालं जीवन सफल
शिक्षण बीज रोवली
आई सावित्री शिकली

साथ दिली ज्योतिबांनी
जाणीव केली स्त्रीमनी
अन्‌ मोडला विरोध
शिक्षणाचे बांधले बंध

अहो करुन सहन
प्रथा, रुढीचे बंधन
नाही मागे सरली
आई सावित्री शिकली

स्वतः झेलून अन्याय
स्त्री जीवन केले धन्य
अन्‌ घडवून समाज मन
केली शाळा स्थापन

अहो देऊन प्रकाश
ठेवला नवा आदर्श
स्त्री मन जिंकली
आई सावित्री शिकली

1 टिप्पणी

  1. आई सावित्रीचा खूप मोठा राष्ट्रीय सन्मान होणे अपेक्षित आहे.
    आपली कविता त्या प्रयत्नातील एक भाग राहील.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.