देणार्‍याने देत जावे (मराठी कविता)

देणार्‍याने देत जावे - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर) यांची लोकप्रिय कविता देणार्‍याने देत जावे.
देणार्‍याने देत जावे (मराठी कविता)
देणार्‍याने देत जावे (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
देणार्‍याने देत जावे - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर) यांची लोकप्रिय कविता देणार्‍याने देत जावे.

देणार्‍याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरुनी सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्या भिमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे

- विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर)

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.