एका तळ्यात होती (मराठी कविता)

एका तळ्यात होती - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी ग. दि. माडगूळकर (गजानन दिगंबर माडगूळकर / गदिमा) यांची लोकप्रिय कविता एका तळ्यात होती.
एका तळ्यात होती (मराठी कविता)
एका तळ्यात होती (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
एका तळ्यात होती - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी ग. दि. माडगूळकर (गजानन दिगंबर माडगूळकर / गदिमा) यांची लोकप्रिय कविता एका तळ्यात होती.

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरुप वेडे पिल्लु तयात एक कोणी न त्यास घेई खेळावयास संगे सर्वांहूनि निराळे ते वेगळे तरंगे दावून बोट त्याला म्हणती हसून लोक आहे कुरुप वेडे पिल्लु तयात एक पिल्लास दु:ख भारी भोळे रडे स्वत:शी भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी जे ते तयास टोची दावी उगाच धाक होते कुरुप वेडे पिल्लु तयात एक एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक

- ग. दि. माडगूळकर (गजानन दिगंबर माडगूळकर / गदिमा)

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.