Loading ...
/* Dont copy */

माझ्या मराठी मातीचा - मराठी कविता (कुसुमाग्रज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांची माझ्या मराठी मातीचा ही लोकप्रिय मराठी कविता.

माझ्या मराठी मातीचा - मराठी कविता (कुसुमाग्रज)

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा...

माझ्या मराठी मातीचा

कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर)

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यांतील शिळा हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात नाही पसरला कर कधी मागायास दान स्वर्णसिंहासनापुढे कधी लवली ना मान हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन स्वर्गलोकाहून थोर मला हिचे महिमान रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्णांतुनी फिरे सरस्वतीची पालखी रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर येथे अहंता द्रवली झाले वसुधेचे घर माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान हिच्या दारिद्र्‍यात आहे भविष्याचे वरदान माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगे जागतील मायदेशातील शिळा

कुसुमाग्रज यांचे इतर लेखन वाचा:

अक्षरमंच - मुक्त विचारपीठ

मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची