Loading ...

चैत्र पालवी - मराठी लेख (सिमा लिंगायत-कुलकर्णी)

चैत्र पालवी (मराठी लेख) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद लेखिका सिमा लिंगायत-कुलकर्णी यांचा चैत्र पालवी हा मराठी लेख.

चैत्र पालवी - मराठी लेख (सिमा लिंगायत-कुलकर्णी)

भारतीय संस्कॄतीमध्ये सण-उत्सवांच्या परंपरांना कालचक्रानुसार होणाऱ्या ऋतुबदलांचेही परिणाम लाभलेले आहे...

चैत्र पालवी

सिमा लिंगायत-कुलकर्णी (पुणे, महाराष्ट्र)

प्रस्तावना
आनंददायी ऋतूबदल चैत्र महिन्यात घडतो. म्हणून तर झाडांना फुटलेल्या नव्या पालवीला ‘चैत्रपालवी’ म्हणतात.

भारतीय संस्कॄतीमध्ये सण-उत्सवांच्या परंपरांना कालचक्रानुसार होणाऱ्या ऋतुबदलांचेही परिणाम लाभलेले आहे. शिशिरानंतर वसंतऋतूचे आगमन होते. झाडांना नवीन पालवी फुटते, नवा बहर येतो. उत्साहाचे नवचैतन्याचे वारे वाहू लागतात. असा हा आनंददायी ऋतूबदल चैत्र महिन्यात घडतो. म्हणून तर झाडांना फुटलेल्या नव्या पालवीला ‘चैत्रपालवी’ म्हणतात, पूर्वीच्या काळी चैत्र महिन्याला ‘मधुमास’ म्हणत; या नावावरूनच या ऋतूचा या महिन्याचा गोडवा ध्यानात यावा. महाराष्ट्रात हिंदून परंपरेनुसार चैत्र महिना हा नव्या वर्षाचा प्रारंभ मानला जातो. या महिन्याची पहिली तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा ही वर्षप्रतिपदा मानली जाते. ‘प्रतिपदा’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृत भाषेत ‘पाडवा’ हा शब्द रुढ झाला. वसंतऋतूचे आगमन आणि नव्या नव्या वर्षाचा प्रारंभ म्हणून ‘चैत्री पाडवा’ साजरा होतो. या दिवशी गुढ्या. तोरणे उभारण्याची परंपरा रुजल्याने या सणाला ‘गुढी पाडवा’ असे संबोधले जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेस हे नाव आहे (चैत्र पालवी). या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष या दिवसापासून सुरू होते. दक्षिण भारतात व भारताच्या इतर भागात नूतन वर्षारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेस होतो. या दिवशी काही धार्मिक विधीही सांगितले आहेत. घरातील सर्वजण तैलाभ्यंण करून उष्णोदकाने स्नान करतात. नंतर कडुलिंबाची पाने भक्षण करतात. कळकाच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेचे भांडे पालथे घालून त्याला कडुलिंबाचे टाळे व फुलांची माळ बांधून दारात तो ध्वज अर्थात गुढी उभारण्याचा पाडवा म्हणूनच याला ‘गुढीपाडवा’ असे म्हणतात. दुपारी मिष्टान्नाचे भोजन करतात. उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात वर्षफळ श्रवण करतात. गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला आहे.

अक्षरमंच - मुक्त विचारपीठमराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची