Loading ...

आनंदी आनंद गडे - मराठी कविता (बालकवी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची आनंदी आनंद गडे ही लोकप्रिय मराठी कविता.

आनंदी आनंद गडे - मराठी कविता (बालकवी)

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे


आनंदी आनंद गडे - मराठी कविता (बालकवी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची आनंदी आनंद गडे ही लोकप्रिय मराठी कविता.



आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभात भरला, दिशात फिरला, जगात उरला
मोद विहरतो चोहिकडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे

नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते, मोदाला, मोद भेटला का तयाला
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे

वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे

स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे

- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

अभिप्राय

  1. आनंदी आनंद गडे - ही कविता बालकवी ठोंबरे यांची आहे, कुसुमाग्रजांची नव्हे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कुसुमाग्रजांच्या कवितेचा साचा वापरल्यामुळे ही चुक झाली होती; सदर चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
      आम्ही आवश्यक ते बदल केले आहेत.

      हटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची