मन वढाय वढाय (मराठी कविता)

मन वढाय वढाय - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री बहीणाबाई चौधरी यांची लोकप्रिय कविता मन वढाय वढाय.
मन वढाय वढाय (मराठी कविता)
मन वढाय वढाय (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
मन वढाय वढाय - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री बहीणाबाई चौधरी यांची लोकप्रिय कविता मन वढाय वढाय.

मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकलं हाकलं फिरी येते पिकावर मन पाखरु पाखरु त्याची काय सागु मात आता व्हतं भुइवर गेलं गेलं आभायात मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन उडारलं उडारलं जसं वारा वाहादन मन जह्यरी जह्यरी याच न्यार रे तन्तर आरे इचू साप बरा त्याला उतारे मन्तर मन एव्हडं एव्हडं जस खसखसचं दान मन केवढं केवढं आभायतबि मावेन देवा आसं कसं मन आसं कसं रे घडलं कुठे जागेपनी तुले असं सपन पडलं

- बहिणाबाई चौधरी

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.