खोपा (मराठी कविता)

खोपा - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री बहीणाबाई चौधरी यांची लोकप्रिय कविता खोपा.
खोपा (मराठी कविता)
खोपा (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
खोपा - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री बहीणाबाई चौधरी यांची लोकप्रिय कविता खोपा.

अरे खोप्यामधी खोपा सुगरनीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला पिलं निजले खोप्यात जसा झूलता बंगला तिचा पिलामधि जीव जीव झाडाले टांगला सुगरिन सुगरिन अशी माझी रे चतुर तिले जल्माचा सांगाती मिये गन्यागम्प्या नर खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा तिची उलूशीच चोच, तेच दात, तेच ओठ तुले देले रे देवानं दोन हात दहा बोटं

- बहीणाबाई चौधरी

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.