Loading ...

आजीचे घड्याळ - मराठी कविता (केशवकुमार)

आजीचे घड्याळ - मराठी कविता (केशवकुमार) - ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी केशवकुमार यांची आजीचे घड्याळ ही लोकप्रिय मराठी कविता.

आजीचे घड्याळ - मराठी कविता (केशवकुमार)

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक


आजीचे घड्याळ - मराठी कविता (केशवकुमार)

ज्येष्ठ प्रसिद्ध कवी केशवकुमार (प्रल्हाद केशव अत्रे / प्र. के. अत्रे / आचार्य अत्रे) यांची आजीचे घड्याळ ही लोकप्रिय मराठी कविता.



आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक
देई ठेवुनि ते कुठे अजुनी हे नाही कुणा ठाउक
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
बाळा झांजर जाहले, आरवला तो कोंबडा, उठ की

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनीया सकाळ न मुळी पत्ता कधी लागता
आली ओटिवरी उन्हे बघ! म्हणे आजी, दहा वाजले
जा जा लौकर! कानी तो घणघणा घंटाध्वनी आदळे

खेळाच्या अगदी भरात गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनीसांज ते न समजे! आजी परी आतुनी
बोले, खेळ पुरे, घरात परता! झाली दिवेलागण
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता
अर्धी रात्र कि रे म्हणे उलटली, गोष्टी पुरे! जा पडा
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला त्यातुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनी तिचे आलो! तरी ना मिळे

- केशवकुमार (प्रल्हाद केशव अत्रे / प्र. के. अत्रे / आचार्य अत्रे)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची