१७ सप्टेंबर दिनविशेष

१७ सप्टेंबर दिनविशेष - [17 September in History] दिनांक १७ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१७ सप्टेंबर दिनविशेष | 17 September in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १७ सप्टेंबर चे दिनविशेष


केशव सीताराम ठाकरे / प्रबोधनकार ठाकरे - (१७ सप्टेंबर १८८५ - २० नोव्हेंबर १९७३) मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते.


शेवटचा बदल १७ सप्टेंबर २०२१

जागतिक दिवस
१७ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • राष्ट्रीय श्रम दिवस व विश्वकर्मा जयंती: भारत.

ठळक घटना / घडामोडी
१७ सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १६३०: बोस्टन शहराची स्थापना झाली.
 • १९४८: हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
 • १९५७: मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
 • १९८३: वनीसा विल्यम्स १ ली कृष्णवर्णीय मिस अमेरिका.
 • १९८८: दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धां सुरू.
 • २००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्कस्टॉक एक्स्चेंज पुन्हा सुरू झाले.
 • २००४: हरिकेन आयव्हनने अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील पेन्साकोला शहराजवळ किनारा गाठला व संपत्तीची अमाप हानी केली.

जन्म / वाढदिवस / जयंती
१७ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८५४: डेव्हिड डनबार ब्युइक (अमेरिकन कार अभियंता, मृत्यू: ५ मार्च १९२९).
 • १८७९: पेरियार ई.व्ही. रामसामी (भारतीय समाजसुधारक, मृत्यू: २४ डिसेंबर १९७३).
 • १८८२: अवंतिकाबाई गोखले (महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका, मृत्यू: २६ मार्च १९४९).
 • १८८५: प्रबोधनकार ठाकरे उर्फ केशव सीताराम ठाकरे (पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, मृत्यू: २० नोव्हेंबर १९७३).
 • १८८८: मिचिओ त्सुजिमुरा (जपानी कृषी शास्त्रज्ञ आणि बायोकेमिस्ट, मृत्यू: १ जून १९६९)
 • १९००: जे. विलार्ड मॅरियट (मॅरियट कॉर्पोरेशनचे संस्थापक, मृत्यू: १३ ऑगस्ट १९८५).
 • १९०६: ज्युनिअस जयवर्धने (श्रीलंकेचे २रे राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: १ नोव्हेंबर १९९६).
 • १९१४: थॉमस जे. बाटा (बाटा शू कंपनीचे संस्थापक, मृत्यू: १ सप्टेंबर २००८).
 • १९१५: मकबूल फिदा हुसेन (चित्रकार व दिग्दर्शक, मृत्यू: ९ जून २०११).
 • १९२२: अगोस्तिन्हो नेटो (अँगोलाचे पहिले राष्ट्रपती, मृत्यू: १० सप्टेंबर १९७९).
 • १९२९: अनंत पै ऊर्फ अंकल पै (अमर चित्र कथा चे जनक, मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११).
 • १९३०: लालगुडी जयरामन (भारतीय व्हायोलिन वादक, मृत्यू: २२ एप्रिल, २०१३).
 • १९३२: इंद्रजीत सिंह (भारतीय - इंग्लिश पत्रकार).
 • १९३७: सीताकांत महापात्र (ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी).
 • १९३८: दिलीप पुरुषोत्तम चित्रे (कवी, कथाकार, समीक्षक, मृत्यू: १० डिसेंबर २००९).
 • १९३९: रविंद्र सदाशिव भट (गीतकार, मृत्यू: २२ नोव्हेंबर २००८).
 • १९५०: नरेंद्र मोदी (भारताचे पंतप्रधान).
 • १९८६: रवीचंद्रन अश्विन (भारतीय क्रिकेटपटू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१७ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८७७: हेन्री फॉक्स टालबॉट (छायाचित्रण कलेचा पाया घालणारे, जन्म: ११ फेब्रुवारी १८००).
 • १९३६: हेन्री लुईस ली चॅटॅलिअर (फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ, जन्म: ८ ऑक्टोबर १९५०).
 • १९९४: व्हिटास गेरुलायटिस (अमेरिकन लॉन टेनिसपटू, जन्म: २६ जुलै १९५४).
 • १९९९: हसरत जयपुरी (हिंदी चित्रपट गीतकार, जन्म: १५ एप्रिल १९२२).
 • २००२: वसंत बापट (कवी, वक्ते, कलावंत, संपादक, जन्म: २५ जुलै १९२२).

दिनविशेष        सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.