१२ सप्टेंबर दिनविशेष

१२ सप्टेंबर दिनविशेष - [12 September in History] दिनांक १२ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१२ सप्टेंबर दिनविशेष | 12 September in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १२ सप्टेंबर चे दिनविशेष


सवाई गंधर्व / रामचंद्र गणेश कुंदगोळकर - (१९ जानेवारी १८८६ - १२ सप्टेंबर १९५२) हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक हे गंधर्व परंपरेतील एक गायक होते.


शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०२१

जागतिक दिवस
१२ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • राष्ट्रीय दिन: केप व्हर्दे.
 • राष्ट्रीय क्रांती दिन: इथियोपिया.

ठळक घटना / घडामोडी
१२ सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १६६६: आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.
 • १८५७: कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले.
 • १८९०: सॅलिसबरी, र्‍होडेशिया शहराची स्थापना.
 • १८९७: तिरह मोहिम: सारगढीची लढाई./li>
 • १९३०: विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.
 • १९४८: आदल्या दिवशी झालेल्या मोहम्मद अली झीणाच्या मृत्यूचा फायदा घेउन भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थानावर चाल केली व हैदराबाद मुक्त केले.
 • १९५९: ल्युना-२ हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.
 • १९७९: इंडोनेशियात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.१ तीव्रतेचा भूकंप.
 • १९८०: तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव.
 • १९९४: फ्रँक युजीन कॉर्डरने सेसना १५० प्रकारचे विमान व्हाइट हाउसवर घातले.
 • १९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.
 • २००२: 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
 • २००५: हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले.
 • २०११: न्यूयॉर्क शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.
 • २०१२: दहशतवाद्यांनी लिब्यातील बेंगाझी आणि इजिप्तमधील कैरो शहरांतील अमेरिकन वकीलातींवर हल्ला चढवून वकीलाती नष्ट केल्या लिब्यातील अमेरिकन राजदूत जॉन क्रिस्टोफर स्टीवन्ससह तीन मृत्युमुखी.
 • २०१२: पाकिस्तानच्या कराची शहरातील कपड्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत २८९ ठार.

जन्म / वाढदिवस / जयंती
१२ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १४९४: फ्रांसिस पहिले (फ्रांसचे राजे, मृत्यू: ३१ मार्च १५४७).
 • १८१८: रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग (गॅटलिंग गन चे संशोधक, मृत्यू: २६ फेब्रुवारी १८०३).
 • १८९४: विभूतिभूषण बंदोपाध्याय (जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक, मृत्यू: १ नोव्हेंबर १९५०).
 • १८९७: आयरिन क्युरी (नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: १७ मार्च १९५६).
 • १९१२: फिरोझ गांधी (इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी, मृत्यू: ८ सप्टेंबर १९६०).
 • १९४८: मॅक्स वॉकर (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, मृत्यू: २८ सप्टेंबर २०१६).
 • १९७७: नेथन ब्रॅकेन (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१२ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १३६२: इनोसंट सहावे (पोप, जन्म: १२८२).
 • १९२६: विनायक लक्ष्मण भावे (मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार, जन्म: ६ नोव्हेंबर १८७१).
 • १९५२: रामचंद्र गणेश कुंदगोळकर उर्फ रामचंद्र गणेश कुंदगोळकर (हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक, जन्म: १९ जानेवारी १८८६).
 • १९७१: जयकिशन डाह्याभाई पांचाळ (शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार, जन्म: ४ नोव्हेंबर १९२९).
 • १९८०: सतीश दुभाषी (रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते, जन्म: १४ डिसेंबर १९३९).
 • १९९२: पंडित मल्लिकार्जुन मन्सूर (गायक, जन्म: ३१ डिसेंबर १९१०).
 • १९९३: रेमंड बर (अमेरिकन अभिनेता, जन्म: २१ मे १९१७).
 • १९९६: श्रीमती पद्मा चव्हाण (नाट्य, चित्रपट अभिनेत्री, जन्म: ७ जुलै १९४८).

दिनविशेष        सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.