Loading ...

आजी हरवली आहे - मराठी कविता

आजी हरवली आहे, मराठी कविता - [Aaji Haravali Aahe, Marathi Kavita] वाकून पाठीत, सहारा काठीत घेऊन, आजी कुठे फिरायला गेली आहे.

आजी हरवली आहे - मराठी कविता | Aaji Haravali Aahe - Marathi Kavita

वाकून पाठीत, सहारा काठीत घेऊन, आजी कुठे फिरायला गेली आहे

वाकून पाठीत, सहारा काठीत घेऊन
आजी कुठे फिरायला गेली आहे?
शोधून द्या मला माझी आजी
माझी आजी हरवली आहे

बाबा म्हणे त्याची आजी
त्याला छान - छान गोष्टी सांगायची
पण बाबा, फक्त गोष्टी सांगण्या पुरती मी
आजी कुठून आणायची?
मला आता छान - छान गोष्ट आहे ऐकायची

शोधून द्या मला माझी आजी
माझी आजी हरवली आहे

सुट्टीत बाबा नेतच नाही गावी
म्हणे तिकडे आता आपलं कोण आहे
घर आलोय सोडून आपण
आपलं तिकडं जाणे आता अयोग्य आहे
पणा आजी म्हणत होती की काळजी माझं
त्यानं तोडून नेलं आहे

शोधून द्या मला माझी आजी
माझी आजी हरवली आहे

आठवतंय मला जेव्हा आजी
पैसे नसतानाही मला रोज खाऊ
खेळणी आणून द्यायची
वाटायचं मला जगात ती
एकटीच श्रीमंत असायची

घरात आली छोटी दीदी
तिची न्हाऊ, मालिशची
जिम्मेदारी वाढली आहे
ऐकलं आहे आता आजीची ती जागा
कोणत्यातरी मावशीने घेतली आहे

शोधून द्या मला माझी आजी
माझी आजी हरवली आहे

परिक्षेच्या निबंध लेखनाच्या
पर्याया मधूनही
माझी आजी वजा होत आहे
पण मला पाठीवर घेऊन घरभर मिरवणारी
आजी मला हवी आहे

शोधून द्या मला माझी आजी
माझी आजी हरवली आहे
माझी आजी हरवली आहे


सचिन पोटे | Sachin Pote
मुंबई, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी माध्यमातून शिक्षण झालेले, अस्सल मुंबईकर सचिन पोटे हे ‘द युथ सोशल फोरम’ या स्वयंसेवी संस्थेसोबत जोडलेले आहेत आणि मराठी भाषेवर नितांत प्रेमापोटी विविध विषयांवर लेखन करतात.

अभिप्राय

  1. या मुंबई च्या धावपळीत आजी ची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद कवि. सचिन पोटे

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची