१३ सप्टेंबर दिनविशेष

१३ सप्टेंबर दिनविशेष - [13 September in History] दिनांक १३ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१३ सप्टेंबर दिनविशेष | 13 September in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १३ सप्टेंबर चे दिनविशेष


- -


शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०२१

जागतिक दिवस
१३ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
१३ सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १२२: हेड्रियनच्या भिंतीचे बांधकाम सुरू.
 • १८९८: हॅनीबल गुडविन यांनी सेल्यूलॉइड फोटोग्राफिक फिल्म चे पेटंट घेतले.
 • १९२२: लिबियातील अझिजिया येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
 • १९२९: लाहोर कटातील आरोपी जतींद्रनाथ दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी मृत्यू.
 • १९४८: ऑपरेशन पोलो - विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.
 • १९७१: न्यू यॉर्कच्या ऍटिका तुरुंगात कैद्यांची दंगल थोपवण्यासाठी पोलिस व नॅशनल गार्डला पाचारण. कारवाईत ४२ ठार.
 • १९८५: सुपर मारियो गेम जपान मध्ये प्रकाशित झाला.
 • १९८९: आर्च बिशप डेस्मंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.
 • १९९६: श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुमती पारिख यांना दिला.
 • २००३: ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन पुरस्कार, तर मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
 • २००६: माँत्रियालच्या डॉसन कॉलेजमध्ये किमवीर गिलने एक विद्यार्थ्याला मारले, १९ जखमी केले व नंतर आत्महत्या केली.

जन्म / वाढदिवस / जयंती
१३ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८५७: मिल्टन हर्शे (द हर्शे चॉकलेट कंपनीचे संस्थापक, मृत्यू: १३ ऑक्टोबर १९४५).
 • १८६५: विल्यम बर्डवुड (भारतीय-इंग्रजी फील्ड मार्शल, मृत्यू: १७ मे १९५१).
 • १८८६: सर रॉबर्ट रॉबिन्सन (नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतिज रंग व अल्कलॉइड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायन शास्त्रज्ञ, मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७५).
 • १८९०: अँटोनी नोगेस (मोनाको ग्रांप्री चे संस्थापक, मृत्यू: २ ऑगस्ट १९७८).
 • १९०२: आर्थर मिचेल (इंग्लिश क्रिकेट खेळाडू, मृत्यू: २५ डिसेंबर १९७६).
 • १९३२: डॉ. प्रभा अत्रे (शास्त्रीय गायिका).
 • १९६३: रॉबिन स्मिथ (दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू).
 • १९६७: मायकेल जॉन्सन (अमेरिकन धावपटू).
 • १९६९: शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९८०: वीरेन रास्किन्हा (भारतीय हॉकी खेळाडू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१३ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ८१: टायटस (रोमन सम्राट, जन्म: ३० डिसेंबर ३९).
 • १५९८: फिलिप दुसरे (स्पेनचे राजे, जन्म: २१ मे १५२७).
 • १८९३: मामा परमानंद (पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक, जन्म: ३ जुलै १८३८).
 • १९२८: श्रीधर पाठक (हिंदी कवी, जन्म: ११ जानेवारी १८५८).
 • १९७१: केशवराव दाते (रंगभूमीवरील अभिनेते, जन्म: २८ सप्टेंबर १८८९).
 • १९७३: सज्जाद झहिर (भारतीय कवी आणि तत्त्ववेक्षक, जन्म: ५ नोव्हेंबर १९०५).
 • १९९५: डॉ. महेश्वर नियोग (प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री, जन्म: ७ सप्टेंबर १९१५).
 • १९९७: लालजी पांडेय तथा अंजान (प्रसिद्ध गीतकार, जन्म: २८ ऑक्टोबर १९३०).
 • २०१२: रंगनाथ मिश्रा (भारताचे २१ वे सरन्यायाधीश, जन्म: २५ नोव्हेंबर १९२६).

दिनविशेष        सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.