६ सप्टेंबर दिनविशेष

६ सप्टेंबर दिनविशेष - [6 September in History] दिनांक ६ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
६ सप्टेंबर दिनविशेष | 6 September in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ६ सप्टेंबर चे दिनविशेष


TEXT - TEXT


शेवटचा बदल २ सप्टेंबर २०२१

जागतिक दिवस
६ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
६ सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • ९५२: सम्राट सुझाकु, जपानी सम्राट.
 • १५२२: फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोचले.
 • १६२०: प्लिमथ, इंग्लंड येथून मेफ्लॉवर जहाजाचा प्रवास सुरू झाला.
 • १७७६: ग्वादालूप बेटावर चक्रीवादळ, ६,००० ठार.
 • १८८८: चार्ल्स टर्नरने एकाच मोसमात २५० क्रिकेट बळी घेण्याचा विक्रम रचला.
 • १९०१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्लीवर खूनी हल्ला.
 • १९३०: लश्करी उठावात आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष हिपोलितो इरिगोयेनची उचलबांगडी.
 • १९३९: दक्षिण आफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
 • १९४०: बल्गेरियाच्या राजा कॅरोल दुसर्‍याने पदत्याग केला. त्याचा मुलगा मायकेल सत्तेवर.
 • १९४९: कॅम्डेन, न्यू जर्सीमध्ये हॉवर्ड अन्रुहने १३ शेजार्‍यांची गोळ्या घालून हत्या केली.
 • १९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.
 • १९६५: भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध-भारताने पाकिस्तानवर हल्ला केला.
 • १९६६: दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.
 • १९६८: स्वाझीलँडला स्वातंत्र्य.
 • १९७०: पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी युरोपमधून न्यू यॉर्कला निघालेल्या दोन विमानांचे अपहरण केले व जॉर्डनला नेली.
 • १९८५: मिडवेस्ट एक्सप्रेस एरलाइन्स फ्लाइट १०५ हे डग्लस डी.सी.-९ प्रकारचे विमान मिलवॉकीहून उड्डाण करताच कोसळले. ३१ ठार.
 • १९८६: अबु निदालच्या हस्तकांनी नेव्हे शालोम येथे सिनॅगॉगवर हल्ला चढवून २२ लोकांना ठार मारले.
 • १९९३: ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.
 • १९९७: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.

जन्म / वाढदिवस / जयंती
६ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १६६६: आयव्हन पाचवा (रशियाचे झार, मृत्यु: ८ फेब्रुवारी १६९६).
 • १७६६: जॉन डाल्टन (ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यु: २७ जुलै १८४४).
 • १८८९: बॅ. शरदचंद्र बोस (स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू, मृत्यू: २० फेब्रुवारी १९५०).
 • १८९२: सर एडवर्ड ऍपलटन (नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यु: २१ एप्रिल १९६५).
 • १९०१: कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले (भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार, मृत्यू: १८ मे १९९७).
 • १९०६: लुइस फेदेरिको लेलवा (नोबेल पारितोषिक विजेते अर्जेन्टीनाचे भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यु: २ डिसेंबर १९८७).
 • १९२३: पीटर दुसरा (युगोस्लाव्हियाचे राजे, मृत्यु: ३ नोव्हेंबर १९७०).
 • १९२९: यश जोहर (भारतीय चित्रपट निर्माते, मृत्यु: २६ जून २००४).
 • १९५४: कार्ली फियोरिना (अमेरिकन उद्योगपती).
 • १९५७: होजे सॉक्रेटिस (पोर्तुगालचा पंतप्रधान).
 • १९७१: देवांग गांधी, (भारतीय क्रिकेट खेळाडू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
६ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ९७२: जॉन तेरावा (रोमन पोप, जन्म: ?).
 • १९०७: सली प्रुडहॉम (नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक, जन्म: १६ मार्च १८३९).
 • १९६३: मंजेश्वर गोविंद पै (कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक, जन्म: २३ मार्च १८८३).
 • १९६६: हेन्ड्रिक व्हेरवोर्ड (दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान, जन्म: ८ सप्टेंबर १९०१).
 • १९७२: अल्लाउद्दीन खाँ (जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार, जन्म: १८६२).
 • १९९०: लेन हटन (इंग्लिश क्रिकेट खेळाडू, जन्म: २३ जून१९१६).
 • २००७: लुसियानो पाव्हारॉटी (इटालियन ऑपेरा गायक, जन्म: १२ ऑक्टोबर १९३५).

दिनविशेष        सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.