Loading ...

देवाकडे राजा मागणारे बेडूक

देवाकडे राजा मागणारे बेडूक, इसापनीती कथा - [Devakade Raja Maganare Beduk, Isapniti Katha] ईश्वर आपणास ज्या स्थितीत ठेवतो तिचा अनादार करून दुसऱ्या स्थितीची इच्छा करू नये. तसेच, मागणे मागावयाचे ते विचारपूर्वक मागावे.

देवाकडे राजा मागणारे बेडूक - इसापनीती कथा | Devakade Raja Maganare Beduk - Isapniti Katha
एका मोठया तळ्यातल्या सगळ्या बेडकांनी एके ठिकाणी जमून विचार केला की, आपण जिकडेतिकडे फिरतो, मनास वाटेल तसे वागतो, हे बरे नाही.

आपणावर देखरेख करणारा कोणी तरी धनी असावा, म्हणजे त्याच्या भयाने आपण आपापल्या मर्यादेने राहू. नंतर त्यांनी, आपणास एक राजा दयावा, अशी देवाची प्रार्थना केली.

ती ऐकून देवास हसू आले, आणि ‘हा घ्या राजा’ असे म्हणून, त्याने आकाशातून एक लाकूड टाकले. ते पाण्यावर आदळताच मोठा आवाज होऊन तळ्यातले पाणी उसळले, ते पाहून बेडूक भ्याले आणि लाकडापासून दूर उभे राहिले.

थोडया वेळाने तळ्यातले पाणी शांत झाल्यावर, त्या लाकडाची हालचाल बंद झालेली पाहून, सगळे बेदूक हळूहळू त्याच्या जवळ गेले. त्याजवर चढून बसले आणि त्याच्याशी खेळू लागले. मग त्यांस असे वाटले की, हा राजा काही कामाचा नाही, देवाकडे दुसरा चांगला राजा मागावा.

नंतर त्यांनी पुन्हा प्रार्थना केली. तेव्हा देवाने त्यांजकडे एक मोठा बगळा पाठविला. त्याने बेडकास खाण्याचा सपाटा चालविला, ते पाहून उरलेले बेडूक भिऊन गेले. मग त्यांनी पुन्हा देवाची प्रार्थाना केली की, ‘दुसरा कोणी तरी चांगला राजा पाठवावा, नाहीतर पूर्वीप्रमाणे राजावाचूनच राहू दयावे!’ ही प्रार्थना ऐकून देव म्हणाला, ‘तुमचे मी आता काही ऐकणार नाही. मी पहिल्यादा जो राजा दिला होता, तो तुम्हास आवडला नाही, तर आता तुमचे कर्म तुम्हीच भोगा!’

तात्पर्य: ईश्वर आपणास ज्या स्थितीत ठेवतो तिचा अनादार करून दुसऱ्या स्थितीची इच्छा करू नये. तसेच, मागणे मागावयाचे ते विचारपूर्वक मागावे.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची