भविष्यवादी - इसापनीती कथा

भविष्यवादी, इसापनीती कथा - [Bhavishyawadi, Isapniti Katha].
भविष्यवादी - इसापनीती कथा | Bhavishyawadi - Isapniti Katha
स्वत:स मोठा भविष्यवादी म्हणविणारा एक गृहस्थ रस्त्यात उभा राहून भविष्य सांगत असे व एखाद्याची काही वस्तु हरवली असल्यास ती कोठे सापडेल, हेही सांगत असे.

एके दिवशी तो आपल्या या कामात अगदी गढून गेला असता, गर्दीतून धक्काबुक्की करीत एक थट्टेखोर माणूस त्याजकडे आला आणि घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला, ‘अहो, चला चला. तुमच्या घरास आग लागली असून इतक्यात सगळे घर जळूनही गेले असेल.’ हे शब्द कानी पडताच ज्योतिषीबुवांनी एकदम आपल्या घराकडे धूम ठोकली.

त्याच्यामागून तो थट्टेखोर मनुष्य व इतर लोकही पळत चालले. तेथे गेल्यावर पाहतात, तो घर शाबूत असून, त्यास आग मुळीच लागलेली नाही. मग तो थट्टेखोर मनुष्य ज्योतिषीबुवाकडे वळून त्यास म्हणतो, ‘काय हो, लोकांच्या नशिबात असलेल्या बऱ्यावाईट गोष्टी जर तुम्हांस कळतात, तर तुमच्या स्वतःच्या नशिबात काय आहे, हे तुम्हांस कसे बरे कळले नाही?’
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.