२४ जुलै दिनविशेष

२४ जुलै दिनविशेष - [24 July in History] दिनांक २४ जुलै च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२४ जुलै दिनविशेष | 24 July in History

दिनांक २४ जुलै च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - (TEXT - TEXT) TEXT.


शेवटचा बदल १ ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
२४ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • सिमोन बॉलिव्हार दिन: इक्वेडोर, व्हेनेझुएला.
 • बाल दिन: व्हानुआतु.

ठळक घटना / घडामोडी
२४ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १४८७: नेदरलॅंड्सच्या लीयुवार्डेन शहरातील नागरिकांनी परदेशी बीयरवरील बंदीविरुद्ध आंदोलन सुरू केले.
 • १५६७: मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स पदच्युत. १ वर्षाचा जेम्स सहावा स्कॉटलंडच्या राजेपदी.
 • १७०१: ऑंत्वान दि ला मॉथ कॅडिलॅकने फोर्ट पॉन्ट्चारट्रेन ही दुकानवजा वसाहत स्थापन केली. याचेच पुढे डेट्रॉईट शहर झाले.
 • १७०४: ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला.
 • १८२३: चिलीमध्ये गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.
 • १८३२: बेन्जामिन बॉनिव्हिलच्या नेतृत्त्वाखाली बैलगाड्यांचा पहिला तांडा वायोमिंगमधील घाट चढून रॉकी माउंटन्स पर्वतरांगेच्या पश्चिमेस पोचला. अमेरिकेच्या पश्चिमेकडील विकासातील ही महत्त्वाची घटना होती.
 • १८४७: आयोवातून १७ महिने पश्चिमेकडे वाटचाल केल्यावर ब्रिगहॅम यंग व १४८ इतर मोर्मोन व्यक्ती सॉल्ट लेक सिटी येथे पोचले.
 • १८६६: टेनेसी परत अमेरिकेत दाखल.
 • १९०१: प्रसिद्ध अमेरिकन लेखक ओ. हेन्रीची बॅंकेतील पैश्यांच्या अपहाराबद्दलची ३ वर्षांची शिक्षा संपून सुटका.
 • १९११: हायराम बिंगहॅम तिसर्‍याने पेरूतील माचु पिच्चु हे प्राचीन कालीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.
 • १९१५: ईस्टलॅंड हे प्रवासी जहाज शिकागो जवळ बुडाले. ८४५ मृत्युमुखी.
 • १९२३: लॉसेनचा तह. तुर्कस्तानची सीमा ठरवण्यात आली.
 • १९३१: पिट्सबर्ग येथे वृद्धाश्रमास आग. ४८ ठार.
 • १९४३: दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली.
 • १९६५: व्हियेतनाम युद्ध - उत्तर व्हियेतनामने अमेरिकेचे लढाउ विमान पाडले.
 • १९६९: सफल चंद्र मोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.
 • १९७४: वॉटरगेट कुभांड - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्वतःविरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.
 • १९९०: इराकने कुवेतच्या सीमेजवळ सैन्याची जमवाजमव करण्यास सुरूवात केली.
 • १९९१: अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
 • १९९७: बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
 • १९९७: माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.
 • १९९८: परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्यात आला.
 • २०००: विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईची विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम भारताची पहिला महिला ग्रँडमास्टर बनली.
 • २००१: सिमिओन सॅक्स-कोबर्ग-गोथा बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी.
 • २००२: आल्फ्रेड मॉइसियु आल्बेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • २००५: लान्स आर्मस्ट्रॉंगने आपली सातवी टुर दि फ्रांस ही सायकलशर्यत जिंकली.
 • २०१४: एर अल्जेरी फ्लाइट ५०१७ हे मॅकडोनेल डग्लस एमडी-८३ प्रकारचे विमान मालीमध्ये कोसळले. ११६ ठार.

जन्म / वाढदिवस / जयंती
२४ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७८६: जोसेफ निकोलेट (फ्रेंच गणितज्ञ व शोधक, मृत्यु: ११ सप्टेंबर १८४३).
 • १८५१: फ्रेडरिक शॉटकी (जर्मन गणितज्ञ, मृत्यु: १२ ऑगस्ट १९३५).
 • १९११: गोविंदभाई श्रॉफ (हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी, मृत्यु: २१ नोव्हेंबर २००२).
 • १९११: अमलज्योती तथा पन्नालाल घोष (बासरीवादक संगीतकार, मृत्यू: २० एप्रिल १९६०).
 • १९२८: केशुभाई पटेल (गुजरातचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य, मृत्यु: २९ ऑक्टोबर २०२०).
 • १९३७: मनोज कुमार (भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक).
 • १९४५: अझीम प्रेमजी (विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन).
 • १९४७: जहीर अब्बास (पाकिस्तानी फलंदाज).
 • १९६९: जेनिफर लोपेझ (अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२४ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ११२९: शिराकावा (जपानी सम्राट, जन्म: ७ जुलै १०५३).
 • १९७०: पीटर दि नरोन्हा (भारतीय उद्योगपती, जन्म: १९ एप्रिल १८९७)
 • १९७४: सर जेम्स चॅडविक (नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक, जन्म: २० ऑक्टोबर १८९१).
 • १९८०: उत्तम कुमार (बंगाली हिंदी चित्रपट अभिनेते, जन्म: ३ सप्टेंबर १९२७).
 • १९८०: पीटर सेलर्स (इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक, यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १९२५).
 • २०१२: रॉबर्ट लिडले (सीटी स्कॅन चे शोधक, जन्म: २८ जुन १९२६).

दिनविशेष        जुलै महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जुलै महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.