Loading ...
/* Dont copy */

१८ जुलै दिनविशेष

१८ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १८ जुलै चे दिनविशेष.

१८ जुलै दिनविशेष | 18 July in History

जागतिक दिवस

१८ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • संविधान दिन: उरुग्वे.

ठळक घटना (घडामोडी)

१८ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
  • १२१६: ऑनरियस तिसरा पोपपदी.
  • १५३६: इंग्लंडमध्ये पोपची सद्दी संपल्याचा फतवा.
  • १८३०: उरुग्वेने आपले पहिले संविधान अंगिकारले.
  • १८६३: अमेरिकन यादवी युद्ध-फोर्ट वॅग्नरची लढाई - श्यामवर्णीय सैनिकांचा युद्धात सर्वप्रथम सहभाग. ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटच्या झेंड्याखाली फोर्ट वॅग्नरवरील हल्ला असफल, परंतु या लढाईत श्यामवर्णीय सैनिकांची बहादुरी व धडाडी अमेरिकन लोकांना दिसली.
  • १८९८: मेरी क्युरी व पिएर क्युरीनी पोलोनियम या नवीन मूलतत्त्वाचा शोध लावला.
  • १९२५: ऍडोल्फ हिटलरने माइन कॅम्फ हे आत्मकथेसदृश पुस्तक प्रकाशित केले.
  • १९६५: सोवियेत संघाच्या झॉंड ३ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • १९६६: अमेरिकेच्या जेमिनी १० या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • १९६८: इंटेल कंपनीची स्थापना.
  • १९६९: अमेरिकेन सेनेटर एडवर्ड केनेडीच्या गाडीला अपघात. सहप्रवासी ठार. ही घटना केनेडीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीतील प्रमुख अडसर होती.
  • १९७६: ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.
  • १९७७: व्हियेतनामला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • १९८४: सान इसिद्रोची कत्तल - कॅलिफोर्नियातील सान इसिद्रो गावातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये २१ लोकांची हत्या. खून्याला पोलिसांनी मारले.
  • १९९५: कॅरिबिअन समुद्रातील मॉंतसेरात द्वीपावरील सुफ्रीयेर ज्वालामुखीचा उद्रेक. राजधानी प्लिमथ उद्ध्वस्त.
  • १९९८: पापुआ न्यू गिनीत त्सुनामीसदृश समुद्री लाटेत ३,००० व्यक्ती मृत्युमुखी.
  • २००१: अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरातील बोगद्यात रेल्वे गाडी रुळांवरून घसरली व पेटली. शहराचा मध्यवर्ती भाग बंद करावा लागला.
  • २०१३: अमेरिकेच्या डेट्रॉइट शहराच्या महानगरपालिकेने २० अब्ज अमेरिकन डॉलर (१२ निखर्व रुपये) इतके कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याचे जाहीर करून दिवाळे जाहीर केले.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१८ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १५५२: रुडॉल्फ दुसरे (पवित्र रोमन सम्राट, मृत्यू: २० जानेवारी १६१२).
  • १८११: विल्यम मेकपीस थॅकरे (इंग्लिश लेखक, मृत्यू: २४ डिसेंबर १८६३).
  • १८४८: डब्ल्यू. जी. ग्रेस (इंग्लिश क्रिकेटपटू, मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१५).
  • १९०९: बिश्नु डे (बंगाली कवी, लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ, मृत्यू: ३ डिसेंबर १९८२).
  • १९१८: नेल्सन मंडेला (दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: ५ डिसेंबर २०१३).
  • १९२१: जॉन ग्लेन (अमेरिकन अंतराळवीर, मृत्यू: ८ डिसेंबर २०१६).
  • १९२७: मेहदी हसन (पाकिस्तानी गझलगायक गझलसम्राट, मृत्यू: १३ जून २०१२).
  • १९३५: जयेंद्र सरस्वती (६९वे शंकराचार्य, मृत्यू: २८ फेब्रुवारी २०१८).
  • १९५०: रिचर्ड ब्रॅन्सन (व्हर्जिन ग्रुपचे स्थापक, हयात).
  • १९४९: डेनिस लिली (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, हयात).
  • १९६७: व्हिन डीझेल (अमेरिकन अभिनेता, हयात).
  • १९७१: सुखविंदर सिंग (भारतीय गायक - गीतकार आणि अभिनेते, हयात).
  • १९७२: सौंदर्या (दक्षिण भारतीय अभिनेत्री, मृत्यू: १७ एप्रिल २००४)
  • १९८२: प्रियांका चोप्रा (भारतीय अभिनेत्री, हयात).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१८ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १८१७: जेन ऑस्टीन (इंग्लिश लेखिका, जन्म: १६ डिसेंबर १७७५).
  • १८६३: रॉबर्ट गुल्ड शॉ (अमेरिकेच्या ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटचे सेनापती, जन्म: १० ऑक्टोबर १८३७).
  • १८९२: थॉमस कूक (पर्यटन व्यवस्थापक, जन्म: २२ नोव्हेंबर १८०८).
  • १९६९: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक, जन्म: १ ऑगस्ट १९२०).
  • १९७४: एस. व्ही. रंगा राव (भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते, जन्म: ३ जुलै १९१८).
  • १९९४: मुनीस रझा (भारतीय शैक्षणिक प्रशासक, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे सहसंस्थापक, जन्म: २ फेब्रुवारी १९२५).
  • २०१२: राजेश खन्ना (हिंदी चित्रपट अभिनेते, जन्म: २९ डिसेंबर १९४२).
  • २०२०: संजीव सॅम गंभीर (भारतीय अमेरिकन वैज्ञानिक आणि आण्विक इमेजिंगचे प्रणेते, जन्म: २३ नोव्हेंबर १९६२).

१८ जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.


जुलै महिन्यातील दिनविशेष

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा.



आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष

विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची