Loading ...
/* Dont copy */

२९ जुलै दिनविशेष

२९ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २९ जुलै चे दिनविशेष.

२९ जुलै दिनविशेष | 29 July in History

जागतिक दिवस

२९ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • आंतरराष्ट्रीय वाघ दिवस.
  • मोहन बागान दिवस.

ठळक घटना (घडामोडी)

२९ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
  • १८१८: ऑगस्टिन फ्रेस्नेल ह्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ यांनी ‘मेमोयर ऑन द डिफ्रॅक्शन ऑफ लाईट’ हे प्रसिद्ध सिद्धांत सादर केले.
  • १८३६: आर्क डी ट्रायम्फे चे पॅरिस, फ्रान्स येथे उद्घाटन झाले.
  • १८५२: पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.
  • १८५८: अमेरिका आणि जपान देशांनी हॅरिस करारावर स्वाक्षरी केली.
  • १८७६: इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स ची स्थापना झाली.
  • १९२०: जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान सुरू झाली.
  • १९२१: ऍडॉल्फ हिटलर हे नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टीचे नेते बनले.
  • १९४६: टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया असे नामकरण झाले.
  • १९४८: लंडन, इंग्लंड येथे १४व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरु झाल्या.
  • १९४८: महायुद्धामुळे १२ वर्षांच्या काळानंतर ऑलिम्पिक स्पर्धांना लंडनमध्ये पुन्हा सुरवात झाली.
  • १९५७: इंटरनॅशनल ऍटॉमिक एनर्जी एजन्सी ची स्थापना झाली.
  • १९५७: आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (International Atomic Energy Agency) ची स्थापना झाली.
  • १९५८: नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA) ची स्थापना झाली.
  • १९८०: इराण देशाने इस्लामिक क्रांतीनंतर नवीन ‘पवित्र’ ध्वज स्वीकारला.
  • १९८५: मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • १९८७: भारत - श्रीलंका शांतता करारावर सह्या करण्यात आल्या.
  • २०२१: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक रशियन मॉड्यूल नौकाच्या इंजिनातील बिघाडानंतर तात्पुरते नियंत्रणाबाहेर गेले.

जन्म (वाढदिवस, जयंती)

२९ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १६०५: सायमन डाख (जर्मन कवी, मृत्यू: १५ एप्रिल १६५९).
  • १८८३: बेनिटो मुसोलिनी (इटलीचे हुकूमशहा, मृत्यू: २८ एप्रिल १९४५)
  • १८९८: इसिदोर आयझॅक (नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: ११ जानेवारी १९८८)
  • १९०४: जे. आर. डी. टाटा (भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक, भारतीय उद्योगपती, मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३).
  • १९२२: बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे (लेखक आणि शिवशाहीर, मृत्यू: १५ नोव्हेंबर २०२१).
  • १९२५: शिवराम दत्तात्रेय फडणीस ऊर्फ शि. द. फडणीस (मराठी व्यंगचित्रकार, हयात).
  • १९३७: डॅनियेल मॅकफॅडेन (अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, हयात).
  • १९५३: अनूप जलोटा (भारतीय भजन गायक, हयात).
  • १९५९: संजय दत्त (हिंदी चित्रपट अभिनेते, हयात).
  • १९८१: फर्नांडो अलोन्सो (स्पॅनिश f१ रेस कार ड्रायव्हर, हयात).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२९ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ११०८: फिलिप (पहिले) (फ्रान्सचे राजे, जन्म: २३ मे १०५२).
  • १८९०: व्हिन्सेंट व्हॅन गॉग (डच चित्रकार, जन्म: ३० ऑगस्ट १८५३).
  • १८९१: ईश्वरचंद्र विद्यासागर (भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि बंगाली समाजसुधारक, बंगाली गद्याचे जनक, जन्म: २६ सप्टेंबर १८२०).
  • १९००: उंबेर्तो पहिले (इटलीचे राजे, जन्म: १४ मार्च १८४४).
  • १९८७: बिभूतिभूषण मुखोपाध्याय (भारतीय बंगाली लेखक, कवी आणि नाटककार, जन्म: २४ ऑक्टोबर १८९४).
  • १९९४: डोरोथी क्रोफूट हॉजकिन (नोबेल पारितोषिक विजेत्या ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, जन्म: १२ मे १९१०).
  • १९९६: अरुणा आसफ अली (भारतीय स्वातंत्र्यसेनानी, जन्म: १६ जुलै १९०९).
  • २००२: सुधीर फडके (महाराष्ट्रातील संगीतकार व गायक, जन्म: २५ जुलै १९१९).
  • २००३: जॉनी वॉकर (हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते, जन्म: ११ नोव्हेंबर १९२६).
  • २००८: इश्मीत सिंग (भारतीय गायक, जन्म: २ सप्टेंबर १९८८).
  • २००९: महाराणी गायत्रीदेवी (जयपूरच्या राजमाता, जन्म: २३ मे १९१९).

२९ जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.


जुलै महिन्यातील दिनविशेष

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा.



आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष

विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची