Loading ...

आरती सप्रेम - दशावताराची आरती

आरती सप्रेम, दशावताराची आरती - आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म, भक्त संकटि नानास्वरूपी स्थापिसि स्वधर्म [Aarti saprem, Dashavatarachi Aarti].

आरती सप्रेम - दशावताराची आरती

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म...

आरती सप्रेम - दशावताराची आरती

आरत्या

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्त संकटि नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥ अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी । वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनिया देसी ॥ मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी । हस्त लागता शंखासुरा तुझा वर देसी ॥ आरती० ॥ १ ॥ रसातळासी जाता पृथ्वी पाठीवर घेसी । परोपकरासाठी देवा कासव झालासी ॥ दाढे धरुनी पृथ्वी नेता वराहरूप होसी । प्रल्हादाकारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ आरती० ॥ २ ॥ पाचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी । भिक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळा नेसी ॥ सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी । वामनरूप धरुनी बळिच्या द्वारी तिष्ठसी ॥ आरती० ॥ ३ ॥ सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला । कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥ निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला । सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ आरती० ॥ ४ ॥ मातला रावण सर्वा उपद्रव केला । तेहतिस कोटी देव बंदी हरिले सीतेला ॥ पितृवचनालागी रामे वनवास केला । मिळोनि वानरसहित राजा राम प्रगटला ॥ आरती० ॥ ५ ॥ देवकीवसुदेवबंदीमोचन त्वा केले । नंदाघरी जाउनी निजसुख गोकुळा दिधले । गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले । गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ आरती० ॥ ६ ॥ बौद्ध कलंकी कलियुगी झाला अधर्म हा अवघा । सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा ॥ म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा । बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा ॥ आरती० ॥ ७ ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

आरती सप्रेम - दशावताराची आरती (व्हिडिओ)


अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची