उठा पांडुरंगा आता - काकड आरती

उठा पांडुरंगा आता, काकड आरती - [Utha Panduranga Ata, Kakad Aarti] उठा पांडुरंगा आता, दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा.
उठा पांडुरंगा आता - काकड आरती | Utha Panduranga Ata - Kakad Aarti

उठा पांडुरंगा आता, दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा

उठा पांडुरंगा आता, दर्शन द्या सकळा ।
झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा ॥ ध्रु० ॥

संत साधू मुनी अवघे, झालेली गोळा ।
सोडा शेजसुख आता, पाहू द्या मुखकमळा ॥ १ ॥

रंगमंडपी महाद्वारी, झालीसे दाटी ।
मन उतावेळ, रूप पहावया दष्टी ॥ २ ॥

राई रखुमाबाई, तुम्हा येऊ द्या द्या ।
शेजे हालवुनी जागे करा देवराया ॥ ३ ॥

गरुड हनुमंत, उभे पाहती वाट ।
स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट ॥ ४ ॥

झाले मुक्तद्वार, लाभ झाला रोकडा ।
विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा ॥ ५ ॥

२ टिप्पण्या

  1. माझी आवडती साईट आहे ही आणि मला अभिमान वाटतो माझ्या मराठी माती चा 🙏
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.