३० ऑगस्ट दिनविशेष

३० ऑगस्ट दिनविशेष - [30 March in History] दिनांक ३० ऑगस्ट च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
३० ऑगस्ट दिनविशेष | 30 August in History

दिनांक ३० ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - (TEXT - TEXT) TEXT.


शेवटचा बदल २७ ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
३० ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • विजय दिन: तुर्कस्तान.

ठळक घटना / घडामोडी
३० ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १५७४: गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी.
 • १७९९: सर राल्फ ऍबरक्रॉम्बीच्या नेतृत्त्वाखाली रॉयल नेव्हीने डच आरमार पकडले.
 • १८३५: ऑस्ट्रेलियात मेलबर्न शहराची स्थापना.
 • १८३५: अमेरिकेत ह्युस्टन शहराची स्थापना.
 • १८६२: अमेरिकन यादवी युद्ध-बुल रनची दुसरी लढाई.
 • १९१८: फान्या कॅप्लानने व्लादिमिर लेनिन वर खूनी हल्ला केला.
 • १९४१: दुसरे महायुद्ध-लेनिनग्राडचा वेढा सुरू झाला.
 • १९४५: दुसरे महायुद्ध-हॉंगकॉंगची जपानच्या आधिपत्यातून सुटका.
 • १९७४: झाग्रेब मध्ये रेल्वे रुळांवरून घसरून १५३ ठार.
 • १९७९: सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड - कुमेन - मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.
 • १९८४: स्पेस शटल डिस्कव्हरीचे पहिले अंतराळगमन.
 • १९९०: तातारस्तानने रशियापासून स्वातंत्र्य जाहीर केले.

जन्म / वाढदिवस / जयंती
३० ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७२०: सॅम्युअल व्हिटब्रेड (व्हिटब्रेड हॉटेल्स चे संस्थापक, मृत्यू: ११ जून १७९६).
 • १८१२: अगोगोस्टन हरसत्थी (ब्यूएना विस्टा वाइनरी चे संस्थापक, मृत्यू: ६ जुलै १८६९).
 • १८१३: ना. धों. ताम्हनकर (बालसाहित्यिक, मृत्यू: ५ जानेवारी १९६१).
 • १८५०: काशिनाथ त्र्यंबक तेलंग (प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, मृत्यू: १ सप्टेंबर १८९३).
 • १८७१: अर्नेस्ट रुदरफोर्ड (नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: १९ ऑक्टोबर १९३७).
 • १८८३: जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद (योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ, मृत्यू: १८ एप्रिल १९६६).
 • १९०३: भगवतीचरण वर्मा (हिंदी कथाकार, कादबंरीकार, कवी , मृत्यू: ५ ऑक्टोबर १९८१).
 • १९०४: नवल होर्मुसजी टाटा (उद्योगपती, मृत्यु: ५ मे १९८९).
 • १९२३: शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेंद्र (हिंदी चित्रपट गीतकार, मृत्यू: १४ डिसेंबर १९६६).
 • १९३०: दशरथ पुजारी (संगीतकार, मृत्यू: १३ एप्रिल २००८).
 • १९३०: वॉरन बफे (अमेरिकन उद्योगपती).
 • १९३४: बाळू गुप्ते (लेग स्पिन गोलंदाज, मृत्यू: ५ जुलै २००५).
 • १९३७: ब्रुस मॅक्लारेन (मॅक्लारेन रेसिंग टीम चे संस्थापक, मृत्यू: २ जून १९७०).
 • १९५४: अलेक्झांडर लुकाशेन्को (बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष).
 • १९५४: रवीशंकर प्रसाद (भारतीय वकील आणि राजकारणी).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
३० ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७७३: नारायणराव पेशवे (मराठा साम्राज्याचे १२वे पेशवे, जन्म: १० ऑगस्ट १७५५).
 • १९४०: सर जे. जे. थॉमसन (नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, जन्म: १८ डिसेंबर १८५६).
 • १९४७: नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी (मराठी कवी, जन्म: १ जून १८७२).
 • १९८१: जे. पी. नाईक (शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक, जन्म: ५ सप्टेंबर १९०७).
 • १९९४: शं. गो. तुळपुळे (प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, जन्म: ५ फेब्रुवारी १९१४).
 • १९९८: नरुभाऊ लिमये (स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार, जन्म: ८ नोव्हेंबर १९०९).
 • २००३: चार्ल्स ब्रॉन्सन (अमेरिकन अभिनेता, जन्म: ३ नोव्हेंबर १९२१).
 • २०१४: बिपन चंद्र (भारतीय इतिहासकार, जन्म: २७ मे १९२८).
 • २०१५: एम. एम. कळबुर्गी (भारतीय विद्वान लेखक, जन्म: २८ नोव्हेंबर १९३८).

दिनविशेष        ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑगस्ट महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.