३ ऑगस्ट दिनविशेष

३ ऑगस्ट दिनविशेष - [3 March in History] दिनांक ३ ऑगस्ट च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
३ ऑगस्ट दिनविशेष | 3 August in History

दिनांक ३ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - (TEXT - TEXT) TEXT.


शेवटचा बदल २ ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
३ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • स्वातंत्र्य दिन: नायजर.
 • सेना दिन: विषुववृत्तीय गिनी.

ठळक घटना / घडामोडी
३ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १४९२: स्पेनच्या राज्यकर्त्यांनी ज्यू व्यक्तींची स्पेनमधून हकालपट्टी केली.
 • १६७८: अमेरिकेत बांधले गेलेले पहिले जहाज ग्रिफोन समुद्रात सोडण्यात आले.
 • १७८३: जपानमध्ये माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक. ३५,००० ठार.
 • १८६०: न्यू झीलॅंडमध्ये दुसरे माओरी युद्ध सुरू झाले.
 • १९००: फायरस्टोन टायर कंपनीची स्थापना.
 • १९१४: पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले.
 • १९१४: बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली.
 • १९२३: कॅल्विन कूलिज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९३६: आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
 • १९४६: अमेरिकेत नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची स्थापना.
 • १९४८: भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.
 • १९६०: नायजेरियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • १९७५: बोईंग ७०७ प्रकारचे खाजगी विमान मोरोक्कोच्या अगादिर शहराजवळ कोसळले. १८८ ठार.
 • १९८१: अमेरिकेच्या १३,००० हवाई वाहतुक नियंत्रकांनी संप पुकारला.
 • १९९४: संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
 • १९९४: सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.
 • १९९७: अल्जीरियात दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकांडात ४०पेक्षा अधिक निरपराध ठार.
 • २०००: मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
 • २००४: राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले.
 • २००५: मॉरिटानियाच्या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध उठाव.
 • २०१४: चीनच्या युनान प्रांतात झालेल्या भूकंपामुळे ३९८ ठार.

जन्म / वाढदिवस / जयंती
३ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७३०: सदाशिवरावभाऊ पेशवे (सेनापती मराठा साम्राज्य, मृत्यू: १४ जानेवारी १७६१).
 • १८८६: मैथिलिशरण गुप्त (हिंदी कवी, मृत्यू: १२ डिसेंबर १९६४).
 • १८९८: उदयशंकर भट्ट (आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार, मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६६).
 • १९००: क्रांतिसिंह नाना पाटील (स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार, मृत्यू: ६ डिसेंबर १९७६).
 • १९१६: शकील बदायूँनी (गीतकार आणि शायर, मृत्यू: २० एप्रिल १९७०).
 • १९२४: लिऑन युरिस (अमेरिकन कादंबरीकार, मृत्यू: २१ जून २००३).
 • १९३९: अपूर्व सेनगुप्ता (भारतीय क्रिकेटपटू, मृत्यू: १४ सप्टेंबर २०१३).
 • १९५६: बलविंदरसिंग संधू (१९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू).
 • १९५७: मणी शंकर (भारतीय चित्रपट दिग्दर्शक).
 • १९६०: गोपाल शर्मा (भारतीय क्रिकेटपटू).
 • १९८४: सुनील छेत्री (भारतीय फुटबॉलपटू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
३ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९२९: एमिल बर्लिनर (फोनोग्राफ चे शोधक, जन्म: २० मे १८५१).
 • १९३०: व्यंकटेश बापूजी केतकर (विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद, जन्म: १२ जानेवारी १८५४).
 • १९५७: देवदास गांधी (पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव, जन्म: २ ऑक्टोबर १९००).
 • १९९३: स्वामी चिन्मयानंद सरस्वती (अध्यात्मिक गुरू, जन्म: ८ मे १९१६).
 • २००७: सरोजिनी वैद्य (मराठी लेखिका, समीक्षिका., जन्म: १५ जून १९३३).
 • २०२०: जॉन ह्यूम (आयरिश नोबेल पीस पुरस्कार विजेते राजकारणी, जन्म: १८ जानेवारी १९३७).

दिनविशेष        ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑगस्ट महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.