२३ ऑगस्ट दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २३ ऑगस्ट चे दिनविशेष.

दिनांक २३ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
ॲना मणी - (२३ ऑगस्ट १९१८ - १६ ऑगस्ट २००१) भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ.
शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०२२
जागतिक दिवस
२३ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- -: -
ठळक घटना (घडामोडी)
२३ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- १३०५: देशद्रोहाच्या आरोपावरुन स्कॉटलंडच्या विल्यम वॉलेसचा वध.
- १६३२: विजापूरच्या आदिलशहाचा वजीर मरार जगदेव याने परिंडा किल्ल्यावर मोगलांच्या ताब्यात असलेली मुलुक-ए-मैदान तोफ विजापूर येथे आणली.
- १७०८: मैडिंग्नु पम्हैबाचा मणिपूरच्या राजेपदी राज्याभिषेक.
- १७७५: इंग्लंडच्या राजा तिसऱ्या जॉर्जने अमेरिकेतील वसाहतींनी उठाव केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.
- १८६६: प्रागचा तह - ऑस्ट्रिया व प्रशियातील युद्ध संपुष्टात आले.
- १९१४: पहिले महायुद्ध - जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली.
- १९२९: हेब्रॉन हत्याकांड - हेब्रॉन शहरात अरब दहशतवाद्यांनी सुमारे ६५ ज्यू व्यक्तींना ठार मारले व उरलेल्यांची हकालपट्टी केली.
- १९३८: इंग्लंडच्या लेन हटनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३६४ धावांची विक्रमी खेळी केली.
- १९३९: दुसरे महायुद्ध-मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार - या कराराच्या गुप्त अटींनुसार जर्मनी व सोवियेत संघाने बाल्टिक देश, फिनलंड, रोमेनिया व पोलंडची आपापसात वाटणी करून घेतली.
- १९४२: दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई सुरू.
- १९४३: दुसरे महायुद्ध-खार्कोव्ह शहराचा वेढा फुटला.
- १९४४: दुसरे महायुद्ध-मार्सेल शहराचा वेढा फुटला.
- १९४४: दुसरे महायुद्ध - रोमेनियाने अक्ष राष्ट्रांचा साथ सोडून दोस्त राष्ट्रांशी संधान बांधले.
- १९४४: अमेरिकन सैन्याचे बी-२४ प्रकारचे विमान इंग्लंडच्या फ्रेकलटन शहरातील शाळेवर पडले. ६१ ठार.
- १९५८: मराठवाडा विद्यापिठाचा प्रारंभ.
- १९७५: लाओसमध्ये उठावात साम्यवादी पक्षाने सत्ता काबीज केली.
- १९८९: एस्टोनिया, लात्व्हिया आणि लिथुएनियातील सुमारे वीस लाख लोकांनी व्हिल्नियस-तालिन रस्त्यावर मानवी साखळी निर्माण केली.
- १९८९: ऑस्ट्रेलियातील १,६४५ वैमानिकांनी सामूहिक राजीनामा दिला.
- १९९०: आर्मेनियाने सोवियेत संघापासून स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
- १९९४: पहिल्या महायुद्धातील एकमेव श्यामवर्णीय वैमानिक युजीन बुलार्ड याला मृत्युपश्चात सेकंड लेफ्टनंटचे पद देण्यात आले.
- २०००: गल्फ एर फ्लाइट ७२ हे विमान इराणच्या अखातात मनामाजवळ कोसळले. १४३ ठार.
जन्म (वाढदिवस, जयंती)
२३ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १७५४: लुई सोळावा, फ्रांसचा राजा.
- १८५२: क्लिमाको काल्देरॉन, कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १८६४: एलेफ्थेरियोस व्हेनिझेलोस, ग्रीसचा पंतप्रधान.
- १९०९: सिड बुलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१७: टेक्स विल्यम्स, अमेरिकन गायक.
- १९१८: ॲना मणी (भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ).
- १९२१: सॅम कूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३१: हॅमिल्टन ओ. स्मिथ, अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ.
- १९३२: हूआरी बूमेदियेन, अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५१: अखमद कादिरोव, चेच्न्याचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५१: नूर, जॉर्डनची राणी.
- १९६३: रिचर्ड इलिंगवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६७: रिचर्ड पेट्री, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७३: केरी वॉल्म्सली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७३: मलाइका अरोरा खान, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
२३ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- ६३४: अबु बकर, अरब खलीफा.
- ११७६: रोकुजो, जपानी सम्राट.
- १३०५: विल्यम वॉलेस, स्कॉटलंडचा क्रांतिकारी.
- १३८७: ओलाफ चौथा, नॉर्वेचा राजा.
- १८०६: चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९२: देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९७१: मूळ शामू, सीवर्ल्डमधील ओर्का देवमासा.
ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / ऑगस्ट दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय