११ ऑगस्ट दिनविशेष

११ ऑगस्ट दिनविशेष - [11 March in History] दिनांक ११ ऑगस्ट च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
११ ऑगस्ट दिनविशेष | 11 August in History

दिनांक ११ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - (TEXT - TEXT) TEXT.


शेवटचा बदल १० ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
११ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • विद्यार्थी दिन: ब्राझील.
 • वकील दिन: ब्राझील.
 • व्हॅलेन्टाईन दिन: तैवान.
 • नायक दिन: झिम्बाब्वे.

ठळक घटना / घडामोडी
११ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • ख्रिस्त पूर्व ३११४: माया दिनदर्शिकेनुसार या दिवशी सध्याचे युग सुरू झाले.
 • १४९२: अलेक्झांडर सहावा पोपपदी.
 • १७८६: कॅप्टन फ्रांसिस लाइटने मलेशियातील पेनांग या वसाहतीची स्थापना केली.
 • १८७७: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला.
 • १८९८: स्पॅनिश - अमेरिकन युद्ध - अमेरिकन सैन्याने पोर्तोरिकोतील मायाग्वेझ हे शहर जिंकले.
 • १९४३: सी. डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
 • १९५१: रेने प्लेव्हेन फ्रान्सच्या पंतप्रधानपदी.
 • १९५२: हुसेन जॉर्डनच्या राजेपदी.
 • १९६०: चाडला फ्रान्सपासून स्वातंत्र्य.
 • १९६१: दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला.
 • १९७९: गुजरात मोर्वी येथे धरण फुटून हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
 • १९८७: ॲलन ग्रीनस्पान युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्वच्या अध्यक्षपदी. ग्रीनस्पान २००६पर्यंत या पदावर होता.
 • १९९४: अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ. फातिमा मीर यांना विश्वगुर्जरी पुरस्कार जाहीर.
 • १९९९: बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.
 • १९९९: शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.
 • २०१३: डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.

जन्म / वाढदिवस / जयंती
११ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८९७: एनिड ब्लायटन (बालसाहित्यीक इंग्लिश लेखिका, मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६८).
 • १९११: प्रेम भाटिया (पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक, मृत्यू: ८ मे १९९५).
 • १९२८: विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे (लेखक व पत्रकार , मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००).
 • १९२८: रामाश्रेय झा (संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान, मृत्यू: १ जानेवारी २००९).
 • १९४३: जनरल परवेझ मुशर्रफ (पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष).
 • १९४४: फ्रेडरिक स्मिथ (फेडएक्स चे संस्थापक).
 • १९५०: स्टीव्ह वोजनियाक (ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक).
 • १९५४: यशपाल शर्मा (भारतीय क्रिकेट खेळाडू).
 • १९५४: मडिरेड्डी नरसिंहराव (भारतीय क्रिकेट खेळाडू).
 • १९७४: अंजु जैन (भारतीय क्रिकेट खेळाडू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
११ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९०८: खुदिराम बोस (क्रांतिकारक, जन्म: ३ डिसेंबर १८८९).
 • १९७०: इरावती कर्वे (साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ, जन्म: १५ डिसेंबर १९०५).
 • १९९९: रामनाथ पारकर (भारतीय क्रिकेट खेळाडू, जन्म: ३१ ऑक्टोबर १९४६).
 • २०००: पी. जयराज (दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते, जन्म: २८ सप्टेंबर १९०९).
 • २००३: अर्मांड बोरेल (स्विस गणितज्ञ, जन्म: २१ मे १९२३).
 • २०१३: जफर फटहॅली (भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक, जन्म: १९ मार्च १९२०).

दिनविशेष        ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑगस्ट महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.