६ ऑगस्ट दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ६ ऑगस्ट चे दिनविशेष.

दिनांक ६ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
अरविंद घोष - (१५ ऑगस्ट १८७२ - ५ डिसेंबर १९५०) अरविंद घोष हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्ज्ञ, आणि महाकवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात. अरविंद घोष यांनी ६ ऑगस्ट १९०६ रोजी ‘वंदे मातरम्’ हे नियतकालीक सुरु केले.
जागतिक दिवस
६ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- स्वातंत्र्य दिन: बॉलिव्हिया, जमैका.
ठळक घटना (घडामोडी)
६ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- १५३८: गाँझालो हिमेनेझ दि केसादाने कोलंबियामध्ये बोगोटा शहराची स्थापना केली.
- १८०६: शेवटच्या पवित्र रोमन सम्राट फ्रांसिस दुसऱ्याने पदत्याग केला व पवित्र रोमन साम्राज्याचा शेवट झाला.
- १८२५: बोलिव्हियाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- १८६१: ब्रिटनने नायजेरियाचे लागोस शहर बळकावले.
- १८९०: न्यू यॉर्कच्या ऑबर्न तुरुंगात विल्यम केमलरला विजेचे झटके देउन मृत्युदंड.
- १९१४: पहिले महायुद्ध - सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९१७: पहिले महायुद्ध - माराशेष्टीची लढाई.
- १९२६: हॅरी हुडिनीने पाण्याखाली एका सीलबंद पेटीत ९१ मिनिटे राहून नंतर सुटका करून घेतली.
- १९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर एनोला गे या नावाच्या विमानातून लिटल बॉय नाव दिलेला परमाणु बॉम्ब टाकला. अंदाजे ७०,००० क्षणात ठार तर अजून हजारो पुढील काही वर्षांत भाजल्याने व किरणोत्सर्गाने मृत्युमुखी.
- १९६०: क्युबाची क्रांती - अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला उत्तर म्हणून क्युबाने अमेरिकेसह सगळ्या परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.
- १९६२: जमैकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६६: ब्रॅनिफ एरलाइन्स फ्लाइट २५० हे विमान नेब्रास्कातील फॉल्स सिटीजवळ पडले. ४२ ठार.
- १९९०: पहिले अखाती युद्ध - कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.
- १९९७: कोरियन एरलाइन्स फ्लाइट ८०१ हे बोईंग ७४७-३०० प्रकारचे विमान गुआमच्या विमानतळावर उतरताना कोसळले. २२८ ठार.
- १९४५: हिरोशिमा दिन. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर जगातील पहिला अणुबॉंम्ब टाकला.
- १९०६: श्री. अरविंद घोष यांनी ‘वंदे मातरम्’ हे नियतकालीक सुरु केले.
जन्म (वाढदिवस, जयंती)
६ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- ११८०: गो-तोबा, जपानी सम्राट.
- १६९७: चार्ल्स सातवा, पवित्र रोमन सम्राट.
- १८०९: आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन, इंग्लिश कवी.
- १८८१: अलेक्झांडर फ्लेमिंग, स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ.
- १९१६: दॉम मिंटॉफ, माल्टाचा पंतप्रधान.
- १९२८: अँडी वॉरहोल, अमेरिकन चित्रकार.
- १९७०: एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- १९९०: जॉनबेनेट रामसे, अमेरिकन बालकलाकार.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
६ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- २५८: पोप सिक्स्टस दुसरा.
- ५२३: पोप हॉर्मिस्दस.
- १२७२: स्टीवन पाचवा, हंगेरीचा राजा.
- १४५८: पोप कॅलिक्स्टस तिसरा.
- १९७८: पोप पॉल सहावा.
- १९९१: शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान.
- २००२: एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ.
ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / ऑगस्ट दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर