चिमणी आणि कबूतर

चिमणी आणि कबूतर, इसापनीती कथा - [Chimni Aani Kabutar, Isapniti Katha] विश्वासाने विश्वास वाढतो ही गोष्ट खरी, पण दोन्ही पक्ष सारखेच विश्वासू पाहिजेत.
चिमणी आणि कबूतर
एक चिमणी आणि एक कबूतर एके दिवशी गोष्टी बोलत बसली असता, चिमणीने सहज कबूतरास म्हटले, ‘अग, ज्या ठिकाणी तुझी पिले पुष्कळ वेळा चोरीस गेली, त्याच ठिकाणी तू पुन्हा घरटे बांधून राहतेस, या तुझ्या वेडेपणास काय म्हणावे बरे?’ कबूतर म्हणाले, ‘चिमूताई, माझा तसा स्वभावच पडला, त्याला मी तरी काय करू? दुसऱ्याला त्रास दयावा अशी माझी इच्छा नाही, आणि दुसऱ्याकडून मला त्रास होईल, अशीही कल्पना मला होत नाही.’

तात्पर्य: विश्वासाने विश्वास वाढतो ही गोष्ट खरी, पण दोन्ही पक्ष सारखेच विश्वासू पाहिजेत.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.