
पिपात मेले ओल्या उंदिर - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकर (बाळ सीताराम मर्ढेकर) यांची लोकप्रिय कविता पिपात मेले ओल्या उंदिर.
पिपात मेले ओल्या उंदिर माना पडल्या, मुरगळल्याविण ओठावरती ओठ मिळाले माना पडल्या, आसक्तिविण गरिब बिचारे बिळात जगले पिपात मेले उचकी देउन दिवस साडला घार्या डोळी गात्रलिंग अन् धुऊन घेउन जगायची पण सक्ति आहे मरायची पण सक्ति आहे उदासतेला जहारी डोळे काचेचे पण मधाळ पोळे ओठावरती जमले तेही बेकलाइटी, बेकलाइटी ओठांवरती ओठ लागले पिपात उंदिर न्हाले, न्हाले