आला आषाढ श्रावण (मराठी कविता)

आला आषाढ श्रावण - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकर (बाळ सीताराम मर्ढेकर) यांची लोकप्रिय कविता आला आषाढ श्रावण.
आला आषाढ श्रावण (मराठी कविता)
आला आषाढ श्रावण (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
आला आषाढ श्रावण - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकर (बाळ सीताराम मर्ढेकर) यांची लोकप्रिय कविता आला आषाढ श्रावण.

आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चातकचोचीने प्यावा वर्षा‌ऋतू तरी काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यात काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत चाळीचाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली ओल्या कौलारकौलारी मेघ हुंगतात लाली ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी ओशाळला येथे यम वीज ओशाळली थोडी धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोडी मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ येता आषाढ श्रावण निवतात दिशा पंथ आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चातकचोचीने प्यावा वर्षा‌ऋतू तरी

- बा. सी. मर्ढेकर (बाळ सीताराम मर्ढेकर)

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.