बाप (मराठी कविता)

बाप - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांची लोकप्रिय कविता बाप.
बाप (मराठी कविता)
बाप (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
बाप - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांची लोकप्रिय कविता बाप.

शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर काटा त्याच्याच का पाई त्यानं काय केलं पाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रातदिस कामधंदा कष्ट सारे त्याच्या हाती बाप फोडतो लाकडं माय पेटविते चुल्हा पिठामागल्या घामाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाचंच खातो जग करी हापाहाप

- इंद्रजीत भालेराव

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.