Loading ...

प्रेम कर भिल्लासारखं - मराठी कविता (कुसुमाग्रज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांची प्रेम कर भिल्लासारखं ही लोकप्रिय मराठी कविता.

प्रेम कर भिल्लासारखं - मराठी कविता (कुसुमाग्रज)

पुरे झाले चंद्र सुर्य, पुरे झाल्या तारा...


प्रेम कर भिल्लासारखं - मराठी कविता (कुसुमाग्रज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांची प्रेम कर भिल्लासारखं ही लोकप्रिय मराठी कविता.



पुरे झाले चंद्र सुर्य, पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून रहा
सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांचा भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होवून जाळत राहणं
प्रेम म्हणजे जंगल होवून जळत जाणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सूद्धा मेघापर्यंत पोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफान सगळं मनामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं

कुसुमाग्रज यांचे इतर लेखन वाचा:

अक्षरमंच - मुक्त विचारपीठ

मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची