Loading ...

पैठणी (मराठी कविता)

पैठणी - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांची लोकप्रिय कविता पैठणी.

पैठणी (मराठी कविता)
पैठणी (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
पैठणी - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांची लोकप्रिय कविता पैठणी.

फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंच्या, टोपडी, शेले - शाली त्यातच आहे घडी करुन जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चोकडी रंग तीचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती पडली होती सार्‍यांच्या पाया हाच पदर धरुन हाती पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास ओळखीची, अनोळखीची जाणीव गुढ आहे त्यास धुप, कापूर, उदबत्यांतून जळत गेले किती श्रावण पैठणीने या जपले तन, एक मन खसहीन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीची, चमेलीची आरास पदरा आडुन हसली वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले अहेवपणी मरण आले माझ्या आजीचे सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून मऊ रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात काळपटाचा जुळतो धागा पैठणीच्या चोकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा

- शांता शेळके

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची