नको नको रे पावसा (मराठी कविता)

नको नको रे पावसा - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांची लोकप्रिय कविता नको नको रे पावसा.
नको नको रे पावसा (मराठी कविता)
नको नको रे पावसा (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
नको नको रे पावसा - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांची लोकप्रिय कविता नको नको रे पावसा.

नको नको रे पावसा असा अवेळी धिंगाणा घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली नको नाचू तडातडा असा कौलारावरुन तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून नको करु झोंबाझोंबी माझी नाजुक वेलण नको टाकू फुलमाळ अशी मातीत लोटून आडदांडा नको येऊ झेपावत दारातून माझं नेसूचं जुनेर नको टाकू भिजवून किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आण ना वेशीपुढे आठ कोस जा रे आडवा धावत विजेबाई कडाकडून मागे फिरव पांथस्थ आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन पितळेची लोटीवाटी तुझ्यासाठी मी मांडीन माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन नको नको रे पावसा असा अवेळी धिंगाणा घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली

- इंदिरा संत

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.