Loading ...
/* Dont copy */

गवतफुला रे (मराठी कविता)

गवतफुला रे - (मराठी कविता) ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री इंदिरा संत यांची लोकप्रिय कविता गवतफुला रे.

गवतफुला रे (मराठी कविता)

रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला


गवतफुला रे (मराठी कविता)

ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांची लोकप्रिय कविता गवतफुला रे.



रंगरंगुल्या, सानसानुल्या
गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला
सांग तुझा रे तुझा लळा

मित्रासंगे माळावरती
पतंग उडवित फिरताना
तुला पाहिले गवतावरती
झुलता झुलता हसताना

विसरुनी गेलो, पतंग नभीचा
विसरुन गेलो मित्रांना
पाहुन तुजला हरखुन गेलो
अशा तुझ्या रे रंगकळा

हिरवी नाजुक, रेशिम पाती
दोन बाजुला सळसळती
नीळनिळुली एक पाकळी
पराग पिवळे झगमगती

तळी पुन्हा अन्‌ गोजीरवाणी
लाल पाकळी खुलते रे
उन्हामध्ये हे रंग पाहता
भानच हरपुनी गेले रे

पहाटवेळी आभाळ येते
लहान होऊनी तुझ्याहुनी
तुला भरविते निळ्या करांनी
दवमोत्यांची कणी कणी

वारा घेऊनी रूप सानुले
खेळ खेळतो झोपाळा
रात्रही इवली होऊन म्हणते
अंगाईचे गीत तुला

गोजिरवाणा हो रविचा कणा
छाया होते इवलीशी
तुझ्या संगती लपून खेळते
रमून जाते पहा कशी

मलाही वाटे लहान होऊन
तुझ्याहुनही लहान रे
तुझ्या संगती सडा रहावे
विसरुन शाळा, घर सारे

आभाळाशी हट्ट करावा
खाऊ खावा तुझ्यासवे
तुझे घालुनि रंगीत कपडे
फुलपाखरां फसवावे


इंदिरा संत यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


- इंदिरा संत

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची