गणपत वाणी (मराठी कविता)

गणपत वाणी - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री बा. सी. मर्ढेकर (बाळ सीताराम मर्ढेकर) यांची लोकप्रिय कविता गणपत वाणी.
गणपत वाणी (मराठी कविता)
गणपत वाणी (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
गणपत वाणी - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री बा. सी. मर्ढेकर (बाळ सीताराम मर्ढेकर) यांची लोकप्रिय कविता गणपत वाणी.

गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी म्हणायचा अन्‌ मनाशीच की या जागेवर बांधिन माडी मिचकावुनि मग उजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवयी, भिरकावुनि ती तशीच ध्यायचा लकेर बेचव जैसा गवयी गिऱ्हाईकाची कदर राखणे जिरे, धणे अन्‌ धान्ये गळित खोबरेल अन्‌ तेल तिळीचे विकून बसणे हिशेब कोळित स्वप्नांवरती धूर सांडणे क्वचित बिडीचा वा पणतीचा मिणमिण जळत्या आणि लेटणे वाचित गाथा श्रीतुकयाचा गोणपटावर विटकररंगी सतरंजी अन्‌ उशास पोते आडोशाला वास तुपाचा असे झोपणे माहित होते काडे गणपत वाण्याने ज्या हाडांची ही ऐशी केली दुकानातल्या जमीनीस ती सदैव रुतली आणिक रुतली काड्या गणपत वाण्याने ज्या चावुनि चावुनि फेकुन दिधल्या दुकानातल्या जमिनीस त्या सदैव रुतल्या आणिक रुतल्या गणपत वाणी बिडी बापडा पितापिताना मरुन गेला एक मागता डोळे दोन देव देतसे जन्मांधाला

- बा. सी. मर्ढेकर (बाळ सीताराम मर्ढेकर)

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.