Loading ...
/* Dont copy */

गणपत वाणी - मराठी कविता (बा. सी. मर्ढेकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बा. सी. मर्ढेकर / बाळ सीताराम मर्ढेकर यांची गणपत वाणी ही लोकप्रिय मराठी कविता.

गणपत वाणी - मराठी कविता (बा. सी. मर्ढेकर)

गणपत वाणी बिडी पिताना, चावायाचा नुसतीच काडी...

गणपत वाणी

बा सी मर्ढेकर (बाळ सीताराम मर्ढेकर, मराठी भाषेतील ज्येष्ठ कवी)

गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी म्हणायचा अन्‌ मनाशीच की या जागेवर बांधिन माडी मिचकावुनि मग उजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवयी, भिरकावुनि ती तशीच ध्यायचा लकेर बेचव जैसा गवयी गिऱ्हाईकाची कदर राखणे जिरे, धणे अन्‌ धान्ये गळित खोबरेल अन्‌ तेल तिळीचे विकून बसणे हिशेब कोळित स्वप्नांवरती धूर सांडणे क्वचित बिडीचा वा पणतीचा मिणमिण जळत्या आणि लेटणे वाचित गाथा श्रीतुकयाचा गोणपटावर विटकररंगी सतरंजी अन्‌ उशास पोते आडोशाला वास तुपाचा असे झोपणे माहित होते काडे गणपत वाण्याने ज्या हाडांची ही ऐशी केली दुकानातल्या जमीनीस ती सदैव रुतली आणिक रुतली काड्या गणपत वाण्याने ज्या चावुनि चावुनि फेकुन दिधल्या दुकानातल्या जमिनीस त्या सदैव रुतल्या आणिक रुतल्या गणपत वाणी बिडी बापडा पितापिताना मरुन गेला एक मागता डोळे दोन देव देतसे जन्मांधाल

बा. सी. मर्ढेकर यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

  1. निनावी१९ मे, २०२३

    मराठी माती म्हणवता आणि बा सि. मर्ढेकराना कवयित्री म्हणता- थोडी तरी लाज बाळगा...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अनामित,
      टंकलेखनाची तांत्रिक चुक निदर्शनास आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.

      हटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची