Loading ...
/* Dont copy */

झपूर्झा - मराठी कविता (केशवसुत)

झपूर्झा (मराठी कविता) - ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) यांची झपूर्झा ही लोकप्रिय मराठी कविता.

झपूर्झा - मराठी कविता (केशवसुत)

हर्षखेद ते मावळले, हास्य निमाले, अश्रु पळाले


झपूर्झा - मराठी कविता (केशवसुत)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) यांची ‘झपूर्झा’ ही लोकप्रिय मराठी कविता.



हर्षखेद ते मावळले

हास्य निमाले
अश्रु पळाले

कंटक-शल्ये बोथटली
मखमालीची लव वठली
काही न दिसे दृष्टीला

प्रकाश गेला
तिमिर हरपला

काय म्हणावे या स्थितीला
झपूर्झा! गडे झपूर्झा

हर्षशोक हे ज्या सगळे

त्या काय कळे
त्या काय वळे

हसतील जरी ते आम्हाला
भय न धरु हे वदण्याला
व्यर्थी अधिकची अर्थ वसे

तो त्यास दिसे
ज्या म्हणती पिसे

त्या अर्थाचे बोल कसे
झपूर्झा! गडे झपूर्झा

ज्ञाताच्या कुंपणावरुन

धीरत्व धरुन
उड्डाण करुन

चिद्घनचपला ही जाते
नाचत तेथे चकचकते
अंधुक आकृति तीस दिसती

त्या गाताती
निगूढ गीती

त्या गीतीचे ध्वनि निघती
झपूर्झा! गडे झपूर्झा

नांगरल्याविण भुई बरी

असे कितितरी
पण शेतकरी

सनदी तेथे कोण वदा
हजारातुनी एखादा
तरी न तेथुनि वनमाला

आणायाला
अटक तुम्हाला

मात्र गात हा मंत्र चला
झपूर्झा गडे-झपूर्झा

पुरुषाशी त्या रम्य अति

नित्य प्रकृति
क्रीडा करती

स्वरसंगम त्या क्रीडांचा
ओळखणे हा ज्ञानाचा
हेतू तयाची सुंदरता

व्हाया चित्ता
प्रत ती ज्ञाता

वाडे कोडे गा आता
झपूर्झा! गडे-झपूर्झा

सूर्य चंद्र आणिक तारे

नाचत सारे
हे प्रेमभरे

खुडित खपुष्पे फिरति जिथे
आहे जर जाणें तेथे
धरा जरा नि:संगपणा

मारा फिरके
मारा गिरके

नाचत गुंगत म्हणा म्हणा
झपूर्झा! गडे-झपूर्झा


केशवसुत यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


- केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)

अभिप्राय

  1. केशवसुत हे कृष्णाजी केशव दामले यांचे टोपणनाव आहे. प्र. के. अत्रे यांचे नव्हे ..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. टंक लेखनाची चूक आम्ही दुरूस्त केली आहे.
      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

      हटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची