Loading ...
/* Dont copy */

आम्ही कोण - मराठी कविता (केशवसुत)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी केशवसुत यांची आम्ही कोण ही लोकप्रिय मराठी कविता.

आम्ही कोण - मराठी कविता (केशवसुत)

आम्ही कोण नसावी, धोपट मार्गा सोडु नको...


आम्ही कोण - मराठी कविता (केशवसुत)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी केशवसुत यांची आम्ही कोण ही लोकप्रिय मराठी कविता.



आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके
देवाचे दिधले असे जगत ये आम्हांस खेळावया
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया
दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया
सौंदर्यातीशया, अशी वसतसे जादू करांमाजि या
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके
शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनीया ज्यांच्या सदा पाझरे
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते

आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे

- केशवसुत

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची