या हो सुर्यनारायणा (मराठी कविता)

या हो सुर्यनारायणा - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांची लोकप्रिय कविता या हो सुर्यनारायणा.
या हो सुर्यनारायणा (मराठी कविता)
या हो सुर्यनारायणा (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
या हो सुर्यनारायणा - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांची लोकप्रिय कविता या हो सुर्यनारायणा.

या हो सुर्यनारायणा या हो या लौकर सोन्याच्या पावलांनी भूषवा हे घर अंगण सारवीले रेखिले स्वस्तिक हळदी-कुंकवानी मंगलसूचक उघडी दालने ही स्वागता आतुर या हो सुर्यनारायणा या हो या लौकर आकाशाच्या मध्यभागी आलात भास्करा तेजाच्या वर्षावात झगमगे धरा येऊ देत माझ्या घरी किरणांचे झोत तेजस्वी पित्याचे ते वात्सल्याचे हात उघडी तावदाने झरोके कौलारी रेंगाळोत घरामाजी किरणे रुपेरी सोन्याच्या वेशीतून निरोप घेताना या हो या अंगणात सूर्यनारायणा आईच्या मायेहून कोमल करांनी गोंजारा बालकांना खेळती अंगणी रंगवा तावदान शिणले अंतर गुलाबी आनंदात न्हाऊ दे संसार

- इंदिरा संत

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.