Loading ...
/* Dont copy */

पितात सारे गोड हिवाळा - मराठी कविता (बा. सी. मर्ढेकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बा. सी. मर्ढेकर (बाळ सीताराम मर्ढेकर) यांची पितात सारे गोड हिवाळा ही लोकप्रिय मराठी कविता.

पितात सारे गोड हिवाळा - मराठी कविता (बा. सी. मर्ढेकर)

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर...

पितात सारे गोड हिवाळा

बा सी मर्ढेकर (बाळ सीताराम मर्ढेकर, मराठी भाषेतील ज्येष्ठ कवी)

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर मुंबापुरीचे उजळित येई माघामधली प्रभात सुंदर सचेतनांचा हुरूप शीतल अचेतनांचा वास कोवळा हवेत जाती मिसळुनि दोन्ही पितात सारे गोड हिवाळा डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरूनी पिवळे हंडे भरून गवळी कावड नेती मान मोडुनी नितळ न्याहारिस हिरवी झाडे काळा वायू हळुच घेती संथ बिलंदर लाटांमधुनी सागर-पक्षी सूर्य वेचती गंजदार पांढर्‍या नि काळ्या मिरवित रंगा अन्‌ नारिंगी धक्क्यावरच्या अजून बोटी साखरझोपेमधी फिरंगी कुठे धुराचा जळका परिमल गरम चहाचा पत्ती गंध कुठे डांबरी रस्त्यावरच्या भुर्‍या शांततेचा निशिगंध ह्या सृष्टीच्या निवांत पोटी परंतु लपली सैरावैरा अजस्त्र धांदल क्षणात देईल जिवंततेचे अर्ध्य भास्करा थांब! जरासा वेळ तोवरी अचेतनांचा वास कोवळा सचेतनांचा हुरूप शीतल उरे घोटभर गोड हिवाळा

बा. सी. मर्ढेकर यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची