मोबाईल संस्कृती, मराठी कविता - [Mobile Sanskruti, Marathi Kavita] घर घेताना, आधी परिसर बघायचे, आता नेटवर्क कव्हरेज आहे का बघतात.
घर घेताना
आधी परिसर बघायचे
आता नेटवर्क कव्हरेज आहे का बघतात
सकाळी उठल्यावर
आधी ब्रश करायचे
आता चार्जर शोधतात
आठवण आल्यावर
आधी पत्र लिहायचे
आता मिस्ड कॉल मारतात
लोक
आधी घरी नसायचे
आता रिचेबल नसतात
लोक पाकिटात
आधी व्हिजीटिंग कार्ड्स ठेवायचे
आता एक्स्ट्रा सीम कार्ड्स ठेवतात
रिफील
आधी स्टेशनरीत मिळायची
आता कुठेही मिळते
आज काल पावसाळ्यात
लोकांकडे छत्री नसते
पण प्लॅस्टीक कव्हर असते
तरुणांच्या गळ्यात
आधी चेन लॉकेट असायचे
आता इअरफोन असतात
हॉटेलमध्ये
आधी जेवणाबरोबर गप्पा असायच्या
आता गप्पा असतात पण तिथे नसलेल्या लोकांशी
विद्यार्थ्यांवर
आधी सबमिशनचं लोड होतं
आताही लोड आहे फक्त ते ‘अप किंवा डाउन’ असतं
ट्रॅफिकमध्ये
आधी पोलीस आणि गाड्या जीव तोडून ओरडायच्या
आता फक्त ‘मिका’ असतो
शुभप्रसंगी
आधी वेळेचं नुकसान व्हायचं
आता ‘आर्चिज’ ‘पोस्टा’चं नुकसान होतय
कारण प्रत्येकजण
आधी लॅंडलाइन्ड होता
आता मोबाईल झालाय
आधी परिसर बघायचे
आता नेटवर्क कव्हरेज आहे का बघतात
सकाळी उठल्यावर
आधी ब्रश करायचे
आता चार्जर शोधतात
आठवण आल्यावर
आधी पत्र लिहायचे
आता मिस्ड कॉल मारतात
लोक
आधी घरी नसायचे
आता रिचेबल नसतात
लोक पाकिटात
आधी व्हिजीटिंग कार्ड्स ठेवायचे
आता एक्स्ट्रा सीम कार्ड्स ठेवतात
रिफील
आधी स्टेशनरीत मिळायची
आता कुठेही मिळते
आज काल पावसाळ्यात
लोकांकडे छत्री नसते
पण प्लॅस्टीक कव्हर असते
तरुणांच्या गळ्यात
आधी चेन लॉकेट असायचे
आता इअरफोन असतात
हॉटेलमध्ये
आधी जेवणाबरोबर गप्पा असायच्या
आता गप्पा असतात पण तिथे नसलेल्या लोकांशी
विद्यार्थ्यांवर
आधी सबमिशनचं लोड होतं
आताही लोड आहे फक्त ते ‘अप किंवा डाउन’ असतं
ट्रॅफिकमध्ये
आधी पोलीस आणि गाड्या जीव तोडून ओरडायच्या
आता फक्त ‘मिका’ असतो
शुभप्रसंगी
आधी वेळेचं नुकसान व्हायचं
आता ‘आर्चिज’ ‘पोस्टा’चं नुकसान होतय
कारण प्रत्येकजण
आधी लॅंडलाइन्ड होता
आता मोबाईल झालाय
अभिप्राय