दिनांक २९ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - (TEXT - TEXT) TEXT.
शेवटचा बदल २७ ऑगस्ट २०२१
जागतिक दिवस
२९ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- राष्ट्रीय क्रीडा दिन: भारत
ठळक घटना / घडामोडी
२९ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- ७०८: जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख: १० ऑगस्ट ७०८).
- १४९८: वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला.
- १८२५: पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
- १८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.
- १८३३: युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.
- १८९८: गुडईयर कंपनीची स्थापना झाली.
- १९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
- १९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.
- १९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
- १९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.
- २००४: मायकेल शुमाकर यांनी पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप जिंकले.
जन्म / वाढदिवस / जयंती
२९ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १७८०: ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र (नव-अभिजात फ्रेंच चित्रकार, मृत्यु: १४ जानेवारी १८६७).
- १८६२: ॲंड्रु फिशर (ऑस्ट्रेलियाचे ५वे पंतप्रधान, २२ ऑक्टोबर १९२८).
- १८८०: माधव श्रीहरी तथा बापूजी अणे (स्वातंत्र्यसैनिक लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १९६८).
- १८८७: जीवराज नारायण मेहता (भारतीय डॉक्टर आणि राजकारणी, मृत्यू: ७ नोव्हेंबर १९७८).
- १९०१: विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील (सहकारमहर्षी पद्मश्री, मृत्यू: २७ एप्रिल १९८०).
- १९०५: मेजर ध्यानचंद (भारतीय हॉकीपटू, मृत्यू: ३ डिसेंबर १९७९).
- १९१५: इन्ग्रिड बर्गमन (स्वीडीश अभिनेत्री, मृत्यू: २९ ऑगस्ट १९८२).
- १९२३: हिरालाल गायकवाड (भारतीय क्रिकेट खेळाडू, मृत्यु: २ जानेवारी २००३).
- १९२३: रिचर्ड अॅटनबरो (इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते).
- १९५८: मायकेल जॅक्सन (अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, मृत्यू: २५ जून २००९).
- १९५९: अक्किनेनी नागार्जुन (दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२९ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १५३३: अताहु आल्पा (पेरूचा शेवटचा इंका राजा, जन्म: १५०२).
- १८९१: पियरे लेलेमेंट (सायकल चे शोधक, जन्म: २५ ऑक्टोबर १८४३).
- १९०४: मुराद (पाचवा) (ओस्मानी सम्राट, जन्म: २१ सप्टेंबर १८४०).
- १९०६: बाबा पद्मनजी मुळे (मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक, जन्म: मे १८३१).
- १९६९: मेहबूबहुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख (लोकशाहीर, जन्म: २० ऑक्टोबर १९१६).
- १९७५: इमॉनडी व्हॅलेरा (आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष, जन्म: १४ ऑक्टोबर १८८२).
- १९७६: काझी नझरुल इस्लाम (इस्लाम क्रांतिकारक बंगाली कवी, जन्म: २५ मे १८९९).
- १९८२: इन्ग्रिड बर्गमन (स्वीडीश अभिनेत्री, जन्म: २९ ऑगस्ट १९१५).
- १९८६: गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर (पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक, जन्म: १५ जून १८९८).
- २००७: बनारसीदास गुप्ता (स्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री, जन्म: ५ नोव्हेंबर १९१७).
- २००८: जयश्री गडकर (मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री, जन्म: २१ फेब्रुवारी १९४२).
दिनविशेष ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |