देव आणि नास्तिक मनुष्य

देव आणि नास्तिक मनुष्य, इसापनीती कथा - [Dev Aani Nastik Manushya, Isapniti Katha] देवापुढे लबाडी चालणार नाही.
देव आणि नास्तिक मनुष्य - इसापनीती कथा | Dev Aani Nastik Manushya - Isapniti Katha

दैवत्वापुढे लुच्चेगिरी उघड होतेच होते

एक अतिषय नास्तिक मनुष्य, एका देवाची फजिती करावी या उद्देशाने त्या देवाकडे गेला.

त्याने आपल्या हातात एक चिमणी धरली होती. मग तो देवास म्हणाला ‘देवा, माझ्या हातात जी वस्तू आहे ती जिवंत आहे की मृत आहे हे सांग.’ देवाने जर जिवंत वस्तु आहे म्हणून सांगितले, तर चिमणीस हातातल्या हातात चिरडून ठार मारावी व देवाचे सांगणे खोटे ठरवावे, असा त्याचा उद्देश होता.

ही त्याची लुच्चेगिरी जाणून देव म्हणाला ‘अरे, तुझ्या हातातली वस्तु अशी आहे की, ती तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ शकेल. ती जिवंत असावी अशी तुझी इच्छा असेल तर ती जिवंत राहील, ती मरावी अशी इच्छा असेल तर ती मरेल!’

तात्पर्य: देवापुढे लबाडी चालणार नाही.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.