आई असं नाव ठेवलं कोणी - मराठी कविता

आई असं नाव ठेवलं कोणी, मराठी कविता - [Aai Asa Naav Thevala Koni, Marathi Kavita] आई तुझं आई असं नाव ठेवलं कोणी, नाही अपेक्षा, नाही तक्रार.
आई असं नाव ठेवलं कोणी - मराठी कविता | Aai Asa Naav Thevala Koni - Marathi Kavita

आई तुझं आई असं नाव ठेवलं कोणी, नाही अपेक्षा, नाही तक्रार

आई तुझं ‘आई’ असं नाव ठेवलं कोणी?
नाही अपेक्षा, नाही तक्रार
असं वागायला शिकवतं का गं तुला कोणी?

पोटभर जेवायला देते तू सगळ्यांना
स्वतःसाठी मात्र शिळेच असते तुझ्या ताटात
आई माझी माय माझी तुझी महिमा किती छान गं
कवियात्रींना पण दिसे तू दुधावरची साय गं

घरात आल्या पाहूण्यांना नेसवते साडी छान ग
पदर तुझा पण फाटका, तुला दिसत कसं न्हाय गं
माझं बाळ, माझा शोन्या दिवस रात्र बोलत राहतेस
थकत कशी न्हाय गं?
समुद्रा एवढे प्रेम देतेस तुला मिळते तरी काय गं?

आई तुझं ‘आई’ असं नाव ठेवलं कोणी?
नाही अपेक्षा, नाही तक्रार
असं वागायला शिकवतं का गं तुला कोणी?


सचिन पोटे | Sachin Pote
मुंबई, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी माध्यमातून शिक्षण झालेले, अस्सल मुंबईकर सचिन पोटे हे ‘द युथ सोशल फोरम’ या स्वयंसेवी संस्थेसोबत जोडलेले आहेत आणि मराठी भाषेवर नितांत प्रेमापोटी विविध विषयांवर लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.