माझं कोकण (मराठी कविता)

माझं कोकण - कवयित्री ऋग्वेदा विश्वासराव यांची कविता माझं कोकण.
माझं कोकण - मराठी कविता
माझं कोकण (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
माझं कोकण - कवयित्री ऋग्वेदा विश्वासराव यांची कविता माझं कोकण.

दर्‍याखोर्‍यातुन जाते माझ्या कोकणाची वाट मला ओढुनिया नेते माझ्या दाराशी हि थेट फणसासारखे मधुर इथल्या माणसांचे मन राजापुरच्या गंगेमुळे भाविकही होती धन्य कोकणात माझ्या निळा विस्तीर्ण सागर मौज वाटे पाहण्यास मासोळ्यांचे सूर लालबुंद या मातीत तांदुळ वरीची पिके कोकणाचा हापुस आंबा अवघे जग जिंके करवंद, जांभुळ, काजु हा तर कोकणी मेवा निसर्गाने दिला जणु अनमोल ठेवा पोटासाठी चाकरमानी मुंबईला जाई परी शिमगा, गणपतीला परतुनी येई

- ऋग्वेदा विश्वासराव.

1 टिप्पणी

  1. आपल्या वेबसाईतवर प्रकाशित होणाऱ्या कवितांची मांडणी सुरेख असते.
    माझ्या कविता येथे प्रकाशित करायच्या आहेत; काय करावे लागेल?
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.