स्त्री भ्रुणहत्या थांबवा (मराठी कविता)

स्त्री भ्रुणहत्या थांबवा - कवयित्री ऋग्वेदा विश्वासराव यांची कविता स्त्री भ्रुणहत्या थांबवा.
स्त्री भ्रुणहत्या थांबवा - मराठी कविता
स्त्री भ्रुणहत्या थांबवा (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
स्त्री भ्रुणहत्या थांबवा - कवयित्री ऋग्वेदा विश्वासराव यांची कविता स्त्री भ्रुणहत्या थांबवा.

ती भयाण वादळी रात्र आणि ती अघोरी हवा कोणी बरे विझवला तो चिमणासा दिवा ॥१॥ होत राहिली अशीच ‘स्त्री भ्रुणहत्या’ तर मिळेल कशी आई प्रेम देणारी लाभेल का प्रेमळ बहिण आणि पत्नी अन आजी रोज गोष्टी सांगणारी ॥२॥ ‘मुलगा मुलगी समान’ हा नारा आज प्रत्येक जण देतोच आहे पण वर्तमानाची स्थिती पाहता मुलीचे प्रमाण घटतेच आहे ॥३॥ उमलु द्या त्या कळीला तिला अजुन जग पहायचय फुलपाखरांमागे पळताना तिला ह्ळुहळु फुलायचय ॥४॥ का मारता तिला मातेच्या गर्भात कारण ती एक मुलगी आहे ? जरा भुतकाळ तपासुन पहा स्त्रीच जीवनाची शिल्पकार आहे ॥५॥ तेजस्विनी, कल्पना, कृष्णा, सुनिता यशस्विनीची नावे किती सांगावी स्त्रीमुळेच आहे आपले अस्तित्व म्हणुनच स्त्री भ्रुणहत्या थांबवावी ॥६॥ जन्मु द्या त्या चिमुकलीला सार्थक या जन्माचे होईल पहाल तुम्ही, हिच चिमुरडी एक दिवस आकाशी भरारी घेईल ॥७॥

- ऋग्वेदा विश्वासराव.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.