दिनांक २५ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - (TEXT - TEXT) TEXT.
शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०२१
जागतिक दिवस
२५ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
२५ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १६०९: गॅलेलियोने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
- १७१८: न्यू ऑर्लिअन्स शहराची स्थापना.
- १७६८: जेम्स कूक आपल्या पहिल्या सफरीवर निघाला.
- १८२५: उरुग्वे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला.
- १९१९: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली.
- १९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.
- १९६०: इटलीतील रोम येथे १७व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
- १९८०: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
- १९९१: बेलारुस सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाले.
- १९९१: लिनस ट्रोव्हाल्डस याने लिनक्स (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.
- १९९१: एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.
- १९९७: दक्षिण कन्नडा जिल्ह्याचे विभाजन. उडुपी हा स्वतंत्र जिल्हा झाला.
- १९९८: एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.
- २००१: सरोद वादक अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.
- २००३: मुंबईत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या दोन कार-बॉम्बस्फोटांमध्ये ५२ ठार.
- २००७: हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ४३ ठार.
जन्म / वाढदिवस / जयंती
१ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९२३: गंगाधर गाडगीळ (साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ, मृत्यू: १५ सप्टेंबर २००८).
- १९३०: शॉन कॉनरी (जेम्स बाँडच्या भूमिकांमुळे गाजलेले अभिनेते, मृत्यु: ३१ ऑक्टोबर, २०२०).
- १९३६: गिरिधारीलाल केडिया (इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक, मृत्यू: १९ डिसेंबर २००९).
- १९४१: अशोक पत्की (संगीतकार).
- १९५२: दुलीप मेंडिस (श्रीलंकेचा क्रिकेटपटू).
- १९६२: डॉ. तस्लिमा नसरीन (बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका).
- १९६५: संजीव शर्मा (भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक).
- १९६९: विवेक राजदान (भारतीय क्रिकेटपटू).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२५ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १२७०: लुई (नववा) (फ्रान्सचा राजा, जन्म: २५ एप्रिल १२१४).
- १८१९: जेम्स वॅट (स्कॉटिश संशोधक, जन्म: १९ जानेवारी १७३६).
- १८२२: विल्यम हर्षेल (जर्मन - ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, जन्म: १५ नोव्हेंबर १७३८).
- १८६७: मायकेल फॅरेडे (इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, जन्म: २२ सप्टेंबर १७९१).
- १९०८: हेन्री बेक्वेरेल (नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थवैज्ञानिक, जन्म: १५ डिसेंबर १८५२).
- २०००: कार्ल बार्क्स (डोनाल्ड डकचा जन्मदाता हास्यचित्रकार, जन्म: २७ मार्च १९०१).
- २००१: डॉ. व. दि. कुलकर्णी (संतसाहित्याचे अभ्यासक समीक्षक, जन्म: ?).
- २००१: केन टाइरेल (टायरेल रेसिंग चे संस्थापक, जन्म: ३ मे १९२४).
- २००८: सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज (उर्दू शायर, जन्म: १२ जानेवारी १९३१).
- २०१२: नील आर्मस्ट्राँग (चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव, जन्म: ५ ऑगस्ट १९३०).
- २०१३: रघुनाथ पनिग्राही (भारतीय गायक - गीतकार, जन्म: १० ऑगस्ट १९३२).
दिनविशेष ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |