सात दिवस आणि सहा रात्री - भाग ५ - मराठी कथा - [Saat Diwas Aani Saha Ratri Part - 5 - Marathi Katha] मित्रांच्या सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणाऱ्या भयकथेचा भाग ५.

सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा
सात दिवस आणि सहा रात्री - भाग ५ (भयकथा)
पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भयानक घटना अनुभवन्यास मिळतात व इथेच मैत्री, प्रेम आणि आयुष्याची खरी किंमत त्यांना कळते या मित्रांच्या सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा.
प्रार्थनाला तिच्या मित्रांचा, ती स्वतः कोण आहे या सगळ्याचा विसर पडलेला असतो. ती आता फक्त शरीररूपी प्रार्थना राहिलेली असते. तिच्या मनावर, मेंदुवर प्रेरणाच्या आत्म्याचा अंकुश असतो. अजिंक्य भानावर येतो व तिला म्हणतो,
“प्रार्थना, आता आपण इथेच राहणार आहोत.”
प्रार्थना म्हणते,
“रियली!”
अजिंक्य म्हणतो,
“येस...! मी आपल्या फ्लॅटसाठी जागाही पाहिली आहे. चल तुलाही दाखवितो.” त्याबरोबर ते दोघेही लॉजच्या बाहेर पडतात.
अजिंक्य प्रेरणाच्या आत्म्याला भुलवून ठरलेल्या जागी घेऊन येतो. तिथे ‘एक्झॉर्सिजमची’ सगळी व्यवस्था करून ठेवलेली असते. फादर थॉमस सोबत तिथे राजेश, नेहा, विवेक व किरण हे देखील असतात. अजिंक्य प्रार्थनाला ती जागा दाखवित असतो. पण प्रार्थनाला त्यात इंटरेस्ट नसतो. ती अजिंक्यचा हात धरून आपल्याकडे खेचते व त्याचे तिथे चुंबन घ्यायला लागते. अजिंक्य फादर थॉमस यांच्या इशार्याची वाट पाहत असतो.
त्याचवेळी फादर थॉमस त्याला इशारा करतात व अजिंक्य प्रार्थनाला जोरदार धक्का देतो. प्रार्थना त्या मोकळ्या जागेत येऊन कोसळते. आजूबाजूंच्या झाडांवर क्रॉसची प्रतिमा लावलेली असते. त्या प्रतिमेतून येणारी उर्जा प्रार्थनाला सहन होत नाही. ती मोठ्याने ओरडू लागते. पण कोणीही तिच्या मदतीला जायचे नाही असे फादर थॉमस यांनी सर्वांना सांगितले असते. प्रार्थनाची ही अवस्था पाहून अजिंक्य व त्याच्या मित्रांना फार वाईट वाटते. पण ती एक हिंस्त्र व दृष्ट आत्मा असते.
ती एक्झॉर्सिजमला दाद देत नाही. प्रार्थना एक मोठी किंचाळी फोडते व गुडघ्यावर पडते. ही प्रेरणाच्या आत्म्याची एक चाल असते. ती प्रार्थनाच्या आवाजात केविलवाणी विनंती करते, “अजिंक्य, मला वाचव या सगळ्यातून. प्लीज अजिंक्य सेव्ह मी.” अजिंक्य थोडा भावूक होतो. आता प्रेरणा प्रार्थनाच्या शरीरास इजा पोहचवू लागते. तिच्या शरीरावर अनेक जखमा होतात. अजिंक्यला प्रार्थनाची ही अवस्था सहन होत नाही. तो अचानक तिच्या जवळ जातो. प्रेरणाला हेच हवे असते. ती अजिंक्यचा गळा धरते. अजिंक्य हवेत उचलला जातो. हे पाहून राजेश व अजिंक्यच्या मित्रांची घाबरगुंडी उडते. आता फादर थॉमस वेळ न दवडता प्रार्थनाच्या जवळ जाऊ लागतात.
त्यांच्या हातात येशू ख्रिस्तांची प्रतिमा असते तर त्यांचे दोन अनुयायी ‘बायबलचे’ वाचन करत असतात. प्रार्थनाच्या नजरेस येशू ख्रिस्तांची प्रतिमा दिसते व कानात बायबलचे उच्चार पडतात तशी ती अजिंक्यला सोडून देते. अजिंक्य जमिनीवर आदळतो. प्रेरणाची आत्मा घाबरून मागे सरकू लागते. मागे तीच खोल दरी असते ज्यात प्रेरणा जीव दिलेला असतो. फादर थॉमस आपल्या हातातील येशू ख्रिस्तांची प्रतिमा प्रार्थनाच्या शरीराला अलगद स्पर्श करवतात. त्या पवित्र स्पर्शाने प्रार्थनाच्या शरीरात असलेली ‘प्रेरणा’ या दृष्ट व तमोगुणी स्त्रीची आत्मा तिच्या तोंडातून काळ्या रंगाच्या ज्वाळात बाहेर पडते.
या गडबडीत प्रार्थना हवेत उचलेली जाते. ती दरीत कोसळणार असते इतक्यात अजिंक्य तिचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचून घेतो आणि अशाप्रकारे प्रेरणाच्या आत्म्यास मोक्ष प्राप्त होतो आणि ते सर्व सुटकेचा निःश्वास सोडतात.
दिवस उजाडतो. अजिंक्य, विवेक, किरण, नेहा हे चारही जण आपापले सामान, बॅगा जीप मध्ये ठेवत असतात. तेवढ्यात प्रार्थना खाली येते. तिला सुखरूप पाहून ते सर्व आनंदित होतात.
प्रार्थना धावत येऊन अजिंक्यला मिठी मारते. तिच्या डोळ्यातून अश्रू तराळत असतात. ती अजिंक्यला ‘आय अॅम सॉरी’ असे म्हणते. माझ्यामुळे तुम्हा सर्वांना खूप त्रास सहन करावा लागला. यावर अजिंक्य प्रार्थनाला म्हणतो, “प्रार्थना ‘जस्ट फर्गेट इट’ हा क्षण आपल्या आयुष्यात येणार होता. आपण सर्व त्यातून बाहेर पडलो.
हेच आपले नशीब म्हणावे लागेल.” ते तिघेही या गोष्टीशी सहमत असतात. किरण आता त्यांना म्हणतो, “बरं, चला आता. आपले आई - वडील वाट पाहत असतील. आपण त्यांना ‘सात दिवस सहा रात्रींची’ ट्रिप सांगून आलो होतो व आता आठ दिवस झाले आहेत. आपल्या ट्रिपचे दिवस कसे गेले ते कळलेच नाही.” किरणच्या बोलण्यावर विवेक त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो व त्याला म्हणतो, ‘तुझ्यासाठी व्हिडिओ शुटींग केले आहे. दाखवू का?’ किरण यावर म्हणतो, ‘नको रे बाबा ! आता मी पुन्हा या साईडला कधी येणार नाही.’ त्याच्या या बोलण्यावर ते सर्व हसू लागतात व तिथून नाशिकला आपल्या घरी जायला निघतात. वाटेत त्यांना समोर राजेश उभा राहिलेला दिसतो.
अजिंक्य आपली जीप थांबवतो. राजेश त्यांच्या जवळ येऊन त्यांना म्हणतो, “मित्रांनो तुमच्यामुळे मला नवीन आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. मी तुमच्या सोबत येऊ शकतो का?” त्याच्या या प्रश्नावर ते सर्वजण खूप आनंदित होतात व राजेशलाही आपल्या सोबत घेऊन परतीच्या प्रवासाला सुरूवात करतात.
कथा समाप्त!
सात दिवस आणि सहा रात्री - मराठी कथा (कथेचे सर्व भाग):
- सात दिवस आणि सहा रात्री भाग १
- सात दिवस आणि सहा रात्री भाग २
- सात दिवस आणि सहा रात्री भाग ३
- सात दिवस आणि सहा रात्री भाग ४
- सात दिवस आणि सहा रात्री भाग ५
- इंद्रजित नाझरे
Far Sundar Ktha Ahe. Mast Vatali.
उत्तर द्याहटवाआपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
हटवा